कोपरगाव शहर व तालुक्यात चिमुकल्यांनी काढली दिंडी
Chimukalya removed Dindi in Kopargaon city and taluka
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 9July, 18.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध वारीत सहभागी होतात.या दिंडीचा अनुभव शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना घेता यावा यासाठी कोपरगाव येथील समता शैक्षणिक संस्थेच्या टायनी टॉटस स्कूल मधील चिमुकल्यांच्या दिंडीचा उपक्रम राबविला.
या दिंडीने पालकांसह नागरिक भारावून गेले. वारकऱ्यांच्या पायी दिंड्या सध्या पंढरपूर च्या दिशेने चालत आहेत.या दिंडीत बालकांना शाळेमुळे सहभागी होता येत नाही.मात्र बालकांनाही या दिंडीचा अनुभव यावा यासाठी समता शैक्षणिक संस्थेच्या टायनी टॉटस स्कूल यांनी चिमुकल्यांची दिंडी काढली.शाळेपासून सुरू झालेली दिंडी निवारा येथील शंकराच्या मंदिरापर्यंत पोहचली. दिंडीच्या अग्रभागी विठ्ठल रुखुमाई चे रूप बालकांनी साकारले. चिमुकल्यांनी डोक्यावर तुळस घेतली होती. काळ मृदुंग टाळ मृदुंगाच्या गजरात लेझीम खेळत या चिमुकल्यांची दिंडी मंदीरात पोहचली.यावेळी विद्यार्थिनी आणि महिलांनी फुगडी खेळून दिंडीचा आनंद लुटला.या दिंडीचे नियोजन स्कुलमधील शिक्षकांनी केले होते.
टाळ मृदुंग पखवाजाच्या गजरात सोनेवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शेकडो चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गावातून पायी दिंडी काढली. या बालगोपालांच्या दिंडीचे पूजन सोनेवाडी ग्रामपंचायत वतीने सरपंच गंगाराम खोमणे व उपसरपंच किशोर जावळे यांच्या वतीने करण्यात आले.
तालुक्यातील पढेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या दिंडीत चिमुकल्यांच्या मधुर वाणीतून विठु नामाचा गजराने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या दिंडीच्या निमित्ताने चिमुकल्या मुलींच्या साडी चोळीचा पेहराव विशेष आकर्षण ठरत होता. शाळेपासुन पांडूरंगाच्या मंदिरासमोरील प्रांगणात भजने आणि फुगड्यांनी आणि विठु नामाच्या गजराने अल्पकाळ आसमंत दुमदुमुन गेला होता.यात ग्रामस्थ भजनी मंडळींनी देखील हिरारीने भाग घेतला.
गौतम पब्लिक स्कूलमध्ये रंगला आषाढी वारीचा रिंगण सोहळा
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात येते. यावर्षी संस्थेच्या सचिव सौ. चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात वारीचे आयोजन करून त्याचबरोबर आषाढी वारीत होणारा रिंगण सोहळा देखील आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांनी याची देही, याची डोळा वारीच्या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून पालखी दिंडी काढली. लहानग्या कलाकारांनी पांडूरंगाच्या भक्तीत तल्लीन होवुन भक्तीगित आविश्कार सादर केला. त्यानंतर सजवलेल्या पालखीतील प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.