आषाढीनिमित्त कोपरगाव रिक्षा संघटनेतर्फे तब्बल १५० किलोची साबुदाणा खिचडी वाटप
Kopargaon Rickshaw Association distributes 150 kg sabudana khichdi on the occasion of Ashadi
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 10July, 18.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : आषाढी एकादशीनिमित्त रविवारी सकाळी ११ वाजता कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेतर्फे सालाबाद प्रमाणे तब्बल दीडशे किलो किलो साबुदाणा खिचडीचे वाटप केले. यंदाचे हे सातवे वर्ष आहे. सुमारे १०० किलो साबुदाणा, १५ किलो शेंगदाणा २० किलो बटाटा, ६ लिटर शेंगदाणा तेल, ४ किलो हिरवी मिरची,३ किलो साखर २ किलो मीठ असे साहित्य वापरण्यात आले.
आषाढी एकादशीच्या आधी साबुदाणा भिजवणे, मिरची कुटणे अधिक कामे आचारीमार्फत केली जातात. सकाळी श्री व सौ समीर जाधव यांच्या हस्ते विठू माऊलीची पूजा करण्यात आली. त्यानंतर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव,उपाध्यक्ष राजेंद्र सालकर, टॅक्सी सेना अध्यक्ष असलम शेख, यांच्या हस्ते हसनभाई यांना खिचडी देऊन खिचडी वाटपाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संचालक मधुकर जाधव, प्रकाश शेळके, मल्हारी देशमुख, मुन्ना मंसूरी, सुनील पांडे, अनिल वाघ, सुनील तांबट, पापा तांबोळी, रवींद्र आरणे, भारत शिनगारे, रणजीत पंडोरे, अशोक गवारे, भगवान बागडे, बाबासाहेब कुंढारे, अशोक भगत, रवींद्र वाघ, मधुकर मानकर या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नागरिकांना व एसटी बस प्रवाशांना अकरा वाजेपासून नागरिकांना व एसटी बस प्रवाशांना दुपारी एक वाजेपर्यंत साबुदाणा खिचडीचे वाटप सुरू होते. सुमारे १००० द्रोण खिचडी वाटपासाठी लागले आहेत. सुमारे तीन आचारी २ कामगार आणि रिक्षा संघटनेचे अंदाजे १०० सभासद व पदाधिकारी साबुदाणा खिचडी वाटप प्रसंगी मदत करीत होते.





