ना. आशुतोष काळेंच्या नेतृत्वाखाली काळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध              

ना. आशुतोष काळेंच्या नेतृत्वाखाली काळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध

  No. Unopposed election of Kale factory under the leadership of Ashutosh Kale

  Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 13July, 17.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : आशिया खंडातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची २०२२-२७ या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व ना. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने सभासदांच्या विश्वासावर सर्वच्या सर्व २१ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

  कोपरगाव तालुक्याची कामधेनू असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम २० जून २०२२ पासून सुरू झाला. २० जून ते २४ जून या कालावधीत उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार होते. या कालावधीत  अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे एकूण १०९ इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कारखान्याचे ज्येष्ठ मागर्दर्शक माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्यावर सोपविला होता. ही निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे लोकशाही पद्धतीने पार पडल्यामुळे ज्या इच्छुक उमेदवारांची इच्छा होती त्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांपैकी पैकी ८८ उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत मागे घेतल्यामुळे एकूण २१ जागांसाठी २१ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे निवडणूक अधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ यांनी या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.                यामध्ये सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती सभासद माहेगाव देशमुख गट – माजी आमदार अशोकराव शंकरराव काळे, आमदार आशुतोष अशोकराव काळे, सूर्यभान बबनराव कोळपे मंजूर गट सचिन दिलीप चांदगुडे, श्रीराम बळवंत राजेभोसले, अशोक कोंडाजी मवाळ पोहेगाव गट – राहुल रमेश रोहमारे, प्रवीण जगन्नाथ शिंदे, राजेंद्र भागवतराव घुमरे चांदेकसारे गट -सुधाकर कोंडाजी रोहोम, दिलीप आनंदराव बोरनारे, शंकरराव गहीनाजी चव्हाण, धामोरी गट -अनिल बाळासाहेब कदम, सुनील शिवाजी मांजरे, मनोज पुंडलिक जगझाप (माळी), उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था – वसंतराव (सुभाष) कचेश्वर आभाळे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिनिधी- मच्छिंद्रनाथ रंगनाथ बर्डे, महिला राखीव प्रतिनिधी- सौ.वत्सलाबाई सुरेश जाधव, सौ. इंदुबाई विष्णू शिंदे इतर मागास वर्ग प्रतिनिधी -दिनार पद्माकांत कुदळे, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग -शिवाजीराव माधव घुले हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.             

 चौकट :- कर्मवीर शंकरराव काळे  साखर कारखाना  निवडणुकीत  उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ८८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेवून निवडणूक बिनविरोध पार पाडली. त्यामुळे नक्कीच कारखान्याचे हित साधले जाणार आहे. भविष्यात देखील मा.खा. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद हिताच्या निर्णयांना नूतन संचालक मंडळ प्राधान्य देईल-ना. आशुतोष काळे   

Leave a Reply

You cannot copy content of this page