आमदार – खासदारकीचे राजीनामे द्या; आणी निवडणुकीला सामोरे जा. जनता ठरवेल ते मान्य करू-आदित्य ठाकरे
MLA – resign from MP; And face the election. We will accept what the people decide – Aditya Thackeray
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 23July, 20.00
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
शिर्डी / कोपरगाव :तुमच्याबद्दल राग नाही, जिकडे गेला तिकडे सुखी राहा, पण लाज वाटत असेल तर आमदार खासदारकीचे राजीनामे द्या आणी निवडणुकीला सामोरे जा.जनता ठरवेल ते मान्य करू अशा शब्दात शिंदे गटात सामील झालेल्या ४० आमदार आणी १२ खासदारांना आव्हान दिले.ज्यांना चुक झाली असे वाटत असेल त्यांनी परत यावे त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असल्याचे स्पष्टोक्ती युवासेना अध्यक्ष माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिर्डी येथील शिवसंवाद यात्रेतील सांगता समारंभात बोलतांना व्यक्त केली.
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची शिवसंवाद यात्रा भिवंडी ,नाशिक, मनमाड, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा,श्रीरामपूर आदी ठिकाणी शिवसैनिकांबरोबर संवाद साधत पहिल्या टप्प्यातील शिवसंवाद यात्रेचा सांगता समारंभ श्री साईबाबांची पावन भूमि शिर्डीत शनिवार दि.२३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पार पडला.यावेळी उत्तरनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचे शिर्डीत आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संवाद साधला.याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आ.सुनील शिंदे,माजीमंत्री बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे, उध्दव कुमठेकर, साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष जगदीश सावंत, विश्वस्त सचिन कोते,राहूल कणाल,डॉ जालिंदर भोर,मिना कांबळी, कमलाकर कोते, सुहास वहाडणे, संजय शिंदे,राजेंद्र पठारे, मुकुंद सिनगर, शिवाजी ठाकरे, दादा कोकणे, विजय जगताप, मछिंद्र धुमाळ, नितीन अशोक कोते, सुयोग सावकारे,अमोल गायके, विश्वजित बागुल,अनिताताई जगताप, स्वातीताई परदेशी, सपनाताई मोरे आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भरपावसात शिवसैनिकांशी संवाद साधतांंना आदित्य ठाकरे म्हणाले की,गद्दार आणी बेईमानांचे सरकार कोसळल्याशिवाय राहाणार नाही.कठीण काळात या लोकांनी साथ सोडायला नव्हती पाहिजे तर याउलट तुम्ही बाहेर नका पडू पण मी तुमच्यासोबत आहे मी तुमच्यासाठी बाहेर पडतो हे त्यांच्याकडून अपेक्षित होते.मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे रुग्णालयात असतांना देखील राज्यात कोव्हिडचे काम सुरू ठेवले.पाच वर्षे शिर्डी लोकसभेचे खासदार दिसले नव्हते, मी त्यांच्या सभा घेतल्या त्यांच्यासाठी जनतेची माफी मागितली, जनतेनेही माफ केले पण आता या गद्दाराला धडा शिकवा आणी पुन्हा या मतदार संघात भगवा फडकवा असे त्यांनी सांगितले.हे सच्चे शिवसैनिक असते तर यांनी गुवाहाटीतील पुरग्रस्तांसाठी मदत केली असती. राजकारण बदलायचे असेल तर राजकारणात चांगल्या लोकांना आणले पाहिजे, शिवसेनेत आगामी काळात चांगल्या लोकांना स्थान देऊन मला ते सिध्द करून दाखवायचे आहे.या चाळीस आमदारांनी आणी बारा खासदारांनी तुमच्यामध्ये येऊन तुमचे मतं ऐकून घ्यायला पाहिजे होती. राज्यात अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली आणी हे बेकायदेशीर मंत्रीमंडळ दिल्लीत जाऊन असल्याचे त्यांनी म्हटले. संवादयात्रेचा समारोपानंतर आदित्य ठाकरे यांनी श्री साईबाबांच्या मंदिरात जाऊन साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
चौकट –
दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार माजीमंत्री बबनराव घोलप यांची एंट्री होताच उपस्थिती शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.मात्र आदित्य ठाकरे यांनी तिकीट माझ्या हातात नसल्याचेही तात्काळ सांगितले.
चौकट – शिर्डी लोकसभा मतदारसंघात सतरा दिवसांत खासदार केलेल्या खा.सदाशिव लोखंडे यांच्या नांवाने युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासमोर उपस्थित पदाधिकारी तसेच शेकडो शिवसैनिकांनी सडेतोड उत्तर देत गद्दाराला माफी नाही अशा घोषणा दिल्या.
फोटो –