समता पॅटर्न जिल्ह्यात सलग चौथ्यांदा अव्वल – सौ स्वाती कोयटे,
Samata Pattern District Top for the 4th Consecutive Time – Mrs. Swati Koyte,
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 24July, 18.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : सी.बी.एस. ई.चा इयत्ता १० वी चा निकाल नुकताच जाहीर झाला. समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात बाजी मारत सुजल कृष्णा फुलसुंदर याने ९८.४ टक्के गुण मिळवुन स्कूल मध्येच नव्हे तर जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. तर अन्वय प्रशांत बारहाते याने ९७.०२ टक्के गुण मिळवत द्वितीय तर सिद्धांत प्रीतम जोशी याने ९७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
समता इंटरनॅशनल स्कूलचे इयत्ता १० वी सी.बी.एस.ई. अभ्यासक्रमांत उत्तुंग भरारी मारली आहे. या वर्षी सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्याने समता पॅटर्न जिल्ह्यात सलग चौथ्यांदा अव्वल ठरला असल्याची माहिती मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती संदीप कोयटे यांनी दिली आहे.
समता स्कूल मधील ४ विद्यार्थी ९५ टक्के त्यामध्ये सुजल फुलसुंदर, अन्वय बारहाते, सिद्धांत जोशी,नील भुतडा या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ९० ते ९५ टक्के च्या दरम्यान गुण मिळविणारे १६ विद्यार्थी असून इंग्रजी विषयात सुजल फुलसुंदर,अन्वय बारहाते, कुलदीप कोयटे, जानवी जानी यांनी १०० पैकी ९९ गुण मिळविले,हिंदी विषयात सिद्धांत जोशी याने १०० पैकी ९९ गुण मिळविले आहे.गणित विषयात सुजल फुलसुंदर याने १०० पैकी १०० गुण तर अन्वय बारहाते याने १०० पैकी ९९ गुण मिळविले. विज्ञान विषयात सिद्धांत जोशी,निनाद शिंदे यांनी १०० पैकी ९९ गुण तर समाजशास्त्र या विषयात जानवी जानी हिने १०० पैकी १०० गुण मिळविले तर अन्वय बारहाते याने १०० पैकी ९९ गुण मिळविले आहे. नील भुतडा, सर्वेश कांगणे, निनाद शिंदे,जय वर्पे, राजहंस आढाव, उन्नती भवर,अरफात देशमुख,माऊली काळे, मानव अग्रवाल,रौनक जैन,नंदिनी कलंत्री,जानवी जानी,कुलदीप कोयटे, खुशी कोठारी,अजिंक्य मिसाळ, मृदुला सोनकुसले, कुशल छाजेड या विद्यार्थ्यांनी ही ९० टक्के च्या पुढे गुण मिळवत यश संपादन केले आहे.
सौ स्वाती कोयटे पुढे म्हणाल्या कि, समता इंटरनॅशनल स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेली संस्था आहे.आम्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभ्यासक्रमाबरोबरच विविध उपक्रम राबवत असतो. ‘Leave No Child Behind’ स्कूलच्या या ब्रीदवाक्याप्रमाणे समता इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील कोणताही विद्यार्थी आयुष्यात शैक्षणिकदृष्ट्या कमी पडू नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन इयत्ता पहिली पासूनच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांतर्गत अभ्यासक्रम पूर्ण करून घेत असतात. तसेच इयत्ता १०वी ला आल्यानंतर गरज व गुणवत्तेनुसार शैक्षणिक, मानसिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. मार्गदर्शनामुळे समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचेच फळ आहे.
या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्कूलचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राचार्या सौ.शिल्पा जेजुरकर , उपप्राचार्य समीर अत्तार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.