कोल्हे कारखान्याच्या व्हॉइस चेअरमनपदी मागासवर्गीय समाजाची वर्णी,सहकार साखर कारखानदारीतील ऐतिहासिक निर्णय

कोल्हे कारखान्याच्या व्हॉइस चेअरमनपदी मागासवर्गीय समाजाची वर्णी,सहकार साखर कारखानदारीतील ऐतिहासिक निर्णय

Characterization of Backward Class Community as Voice Chairman of Kolhe Factory, Historic Decision in Cooperative Sugar Factory

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 22July, 17.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या निधनानंतर कोल्हे कारखान्याची निवडणूकीत सर्व सभासदांनी एक विचाराने स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांना श्रद्धांजली म्हणून २१ जागांसाठी २१ अर्जच दाखल केले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. हा सहकार साखर कारखाना निवडणुकीतील इतिहास घडला. पण प्रकरण एवढ्यावरच न थांबता बिपिन कोल्हे यांनी सहकारी साखर कारखानदारीतील मोठे व मानाचे असे व्हॉइस चेअरमन पद रमेश घोडेराव यांना देऊन मागासवर्गीय समाजाला संधी दिली आहे. ही सुद्धा सहकार साखर कारखानदारीतील संविधानाला अनुसरून ऐतिहासिक व आदर्श घटना म्हणता येईल. तसे यापूर्वीही बिपिन कोल्हे यांनी नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पद अरिफ कुरेशी यांना देवून अल्पसंख्यांक कुरेशी समाजाला देऊन नवा पायंडा पाडला होता. या प्रकारचे धाडसी निर्णय कोल्हे कुटुंबीयच घेऊ शकते. हे वारंवार कृतीतून दिसून आले आहे.

स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी सन १९९१ साली तात्कालीन संजीवनी कारखान्याची धुरा चेअरमन पदाच्या माध्यमातून वयाचे २९ व्या वर्षी बिपीन कोल्हे यांच्या खांद्यावर दिली. स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या कार्यकाळात सहकार साखर कारखानदारी जोमात होती. परंतु सन १९९१ सालापासून ते सन २०२२ पर्यंत त्या तुलनेत त्यांचे राजकीय वारसदार बिपिन कोल्हे यांनी गेली ३१ वर्ष कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहत होते. त्यांच्याकडे राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रातला दांडगा अनुभव होता. त्यामुळे त्यांनी कोल्हे कारखान्याची धुरा अतिशय समर्थपणे पेलली व स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार साखर कारखानदारीने अनेक मानवनिर्मित व नैसर्गिक संकटांचा सामना केला अतिशय खडतर अशा ३१ वर्षात स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बिपिन कोल्हे यांनी अतिशय धाडसीपणे लढत देऊन संजीवनी कारखान्याची धुरा सांभाळली एवढ्यावरच न थांबता अशाही परिस्थितीत त्यांनी मार्ग काढत केवळ साखर धंद्यावर अवलंबून न राहता संपूर्ण संजीवनी साखर कारखानदारी तंत्रज्ञानात व उपपदार्थ निर्मितीत बोटावर मोजणाऱ्या साखर कारखानदारीत नावलौकिक मिळवून आर्थिक सक्षम केला . सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या निधनामुळे साखर कारखानदारीवर घट्ट पकड असणारा अभ्यासू व सर्वसामान्य लोकांच्या मनात घर निर्माण केलेल्या नेत्याची उणीव सर्वसामान्य शेतकरी व सभासद यांना जाणवत आहे. असले तरी कारखान्याच्या निवडणुकीतील घटनाक्रम पाहता बिपिन कोल्हे यांनी घेतलेले निर्णय व सर्वांना सामावून घेण्याची त्यांची हातोटी, नवे पांयडे पाडण्याची धाडसी वृत्ती, पाहता येणाऱ्या काळात स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची उणीव ते नक्कीच काही प्रमाणात भरून काढतील यात शंका नाही. या २१ संचालकांकडे पाहिले असता हे संचालक मंडळ तयार करताना सर्व बाजूंनी व दूरदृष्टीने विचार करण्यात आला तर सर्व स्तरातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. २१ जणांचे संचालक मंडळ तयार करताना दहा नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर ८ जुन्या  संचालकांची फेर निवड करण्यात आली आहे  तर पूर्वी कधीकाळी संचालक मंडळात असलेल्या तीन जणांचा पुन्हा संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे मागील पंचवार्षिक ला तज्ञ संचालक म्हणून काम पाहिलेल्या युवा नेते विवेक कोल्हे यांनी कारखान्याचे नेतृत्व स्वीकारावे अशी संचालकाची भावना होती. त्यामुळेच २१ जुलै रोजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची विवेक कोल्हे यांची वयाच्या ३२ व्या वर्षी निवड करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या कोल्हे कारखान्याच्या अध्यक्षपदी आता विवेक कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक कोल्हे यांना सहकार व राजकीय अनुभव पुरेसा नाही. मात्र कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी पाहता गेल्या दहा वर्षांपासून विधानसभा, लोकसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ते ग्रामपंचायत आणि साखर कारखाने, सोसायट्यांपासून विविध पातळीवरील निवडणुका प्रचार आणि राजकीय आखाडेही त्यांनी अनुभवले असल्याने ते यासाठी सक्षम ठरू शकतात. मागील पाच वर्ष तज्ञ संचालक असताना त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतीचे चेअरमन व जिल्हा बँकेचे संचालक , इफको चे संचालक पद भूषविता ने त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. बिपिन कोल्हे यांनी संजीवनी साखर कारखान्याला एक नवी आधुनिक व तंत्रज्ञान युक्त अशी उपपदार्थ निर्मितीची नवी ओळख दिली आहे येत्या दोन-चार वर्षात अनेक उपपदार्थ निर्मितीचे उत्पादन सुरू होईल.सर्व काही स्थिर होईल त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना विवेक कोल्हे यांना बळ मिळणार आहे. बिपिन कोल्हे यांचे सक्षम दूरगामी,दूरदृष्टी असलेले मार्गदर्शन आजोबांचे गुण नातवा येतात या उक्तीप्रमाणे विवेक कोल्हे यांच्याकडे जन्मजात आजोबा स्वर्गीय शंकरराव कोल्हेप्रमाणे धाडसी वृत्ती व निर्णय क्षमता आली आहे. तर दुसरीकडे आई सौ. स्नेहलता कोल्हे यांच्याकडून मिळालेले राजकारणाचे बाळकडू व संघटन कौशल्य यामुळे येणाऱ्या काळात कोल्हे कारखान्याचे भवितव्य निश्चितच उज्वल राहील यात शंका नाही.

चौकट कल आज और कल या चित्रपटाप्रमाणे  स्वर्गीय शंकरराव कोल्हे हे कल होते बिपिन कोल्हे आज आहे तर विवेक कोल्हे हे कल आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page