शिंगवेमधील काळे गटाच्या कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश.
Entry of kale group activists into Kolhe group in Shingwe.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 25July, 18.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : तालुक्यातील शिंगवे येथील काळे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी भाजप कोल्हे गटात प्रवेश केला त्यांचा सत्कार कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे या होत्या.
याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तमराव बाभुळके, उपसरपंच प्रशांत शिवाजी काळवाघे, गणिभाई शेख, जनार्दन ठोंबरे, राजेंद्र बाभुळके, राजेंद्र काळे, राजेंद्र काळवाघे, नितीन चौधरी, अरूण बाभूळके यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंगवे सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोकराव चौधरी सर, सोमनाथ पठारे, किरण पठारे, चंद्रभान लोखंडे, भाउसाहेब पठारे, दिपक पठारे, दत्तात्रय पठारे, आण्णासाहेब पठारे, सुर्यभान पठारे, बाबासाहेब लोखंडे, भारत पठारे, माणिक लोखंडे, गणेश शिद, अमोल शेळके, तुषार चौधरी, किरण पठारे, पोपट बरवंट, गणेश पठारे, आबा पठारे, मिननाथ पठारे, संतोष चौधरी, दत्तात्रय लोखंडे, दिलीप पठारे, नवनाथ पठारे, राहुल पठारे, योगेश नरोडे आदिंनी कोल्हे गटात प्रवेश केला.
विवेक कोल्हे यांचे संघटन कौशल्य व काम करण्याच्या पद्धतीमुळे प्रभावित होऊन आपण भाजप कोल्हे गटात प्रवेश केला असल्याच्या भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या सत्कार प्रसंगी विवेक कोल्हे यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना तुमचा विश्वास सार्थ करू अशी ग्वाही दिली.
सुत्रसंचलन चेतन काळवाघे तर आभार नितीन चौधरी यांनी मानले.
यावेळी शिंगवे ग्रामस्थांनी युवा नेते विवेक कोल्हे यांची सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला.