राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने भारतीय संविधान व नारी शक्तीचा विजय- स्नेहलता कोल्हे
Election of President Draupadi Murmu – Victory of Indian Constitution and Women’s Power – Snehalata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 25July, 18.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या निवडने भारतीय संविधान व नारी शक्तीचा विजय असल्याच्या भावना भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी आदिवासी महिला समवेत फटाक्याची आतिषबाजी करून लाडू पेढे वाटून आनंदोत्सव प्रसंगी व्यक्त केल्या. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना शिक्षिका ते राष्ट्रपती हा द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास हा आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी महिलांसाठी अभिमानास्पद असल्याचेही त्या म्हणाल्या,
फोटो – सौ स्नेहलता कोल्हे आदिवासी महिलांना पेढे व लाडू भरवताना(छाया- जय जनार्दन फोटो, संजीवनी)
सौ कोल्हे पुढे म्हणाल्या, भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारने असे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातून आदिवासी समुदायांच्या आशा-आकांक्षा पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यानंतर आलेल्या एकाही सरकारने आदिवासी जमातींच्या विकासासाठी कुठलीच ठोस पावले उचलली नाहीत, हे कटू सत्य आहे. आदिवासींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत आणि त्यांना योग्य राजकीय प्रतिनिधित्वदेखील मिळाले नाही. आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाप्रति पंतप्रधान मोदी यांच्या दृढ वचनबद्धतेचे हे ज्वलंत उदाहरण आहे. भारतात गरीब स्वप्न पाहू शकतो आणि पूर्णही करू शकतो हेच यातून सिद्ध होते. असे स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
फोटो – आदिवासी महिलांचा सत्कार करताना स्नेहलता कोल्हे(छाया- जय जनार्दन फोटो, संजीवनी)
साहेबराव रोहोम, जितेंद्र रणशूर, विनोद राक्षे, अकबर लाला शेख आदींची भाषणे झाली. याप्रसंगी संजीवनी पतसंस्थेचे बँकेचे अध्यक्ष प्रदीप नवले, उपाध्यक्ष राजेंद्र परजणे, दीपक चौधरी, स्वप्नील निखाडे, विक्रम पाचोरे, विजय चव्हाणके, अविनाश पाठक, कानिफनाथ गुंजाळ, नारायणशेठ अग्रवाल, माणिकराव चव्हाण, श्रीहरी रोहमारे, सुशांत खैरे, दिनेश कांबळे, दत्ता कोळपकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, कोपरगाव शहर, येसगाव, मुर्शतपुर, शिंगणापूर, संवत्सर, कुंभारी, जेऊर कुंभारी, धारणगाव, हिंगणी, जेऊर पाटोदा, सोनारी, चांदगव्हाण आदी गावातील आदिवासी महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या संख्येने उपस्थित होते.