दफनभूमी व स्मशानभूमीचा प्रश्न ना. आशुतोष काळेंनी सोडविला

दफनभूमी व स्मशानभूमीचा प्रश्न ना. आशुतोष काळेंनी सोडविला

Question of burial ground and crematorium. Solved by Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 25July, 19.00
By
राजेंद्र सालकर

 कोपरगाव : करंजी येथील आदिवासी स्मशानभूमी मढी बुद्रुक व रहा चितळे येथील मुस्लिम दफनभूमीसाठी शासनाकडून जागा देऊन प्रश्न सोडविला त्या जागेचे शासन मंजुरी आदेश सोमवारी तहसील येथील आढावा बैठकीत ना. आशुतोष काळे यांनी संबंधितांना दिले आहे त्याबद्दल नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले.

यावेळी आशुतोष काळे म्हणाले की, नागरिकांना हेलपाटे मारावयास न लावता महसूल विभागाने नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन जलद सेवा देऊन अडचणी दूर कराव्यात असे सक्त आदेश दिले . पुढील बैठकीत याच तक्रारी आल्यास अधिकाऱ्यांची गय करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. शिवरस्ते, शेत पानंद रस्ते व विवादित रस्त्यांची प्रकरणे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी अपंग योजना, श्रावणबाळ योजना व राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनांचा त्यानी आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापनाचा संभाव्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत याचा देखील आढावा घेतला. पुराच्या पाण्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे अशा सूचना ना. आशुतोष काळे यांनी यावेळी महसूल विभागाला दिल्या.          

फोटो – दफनभूमीच्या प्रश्न सोडविल्याबद्दल मुस्लिम बांधवांकडून नामदार आशुतोष  काळे यांचा सत्कार

याप्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरणारे, अनिल कदम, विष्णु शिंदे, गोरक्षनाथ जामदार, सौ. पौर्णिमा जगधने, अर्जुन काळे,  सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, सुधाकर होन, राहुल जगधने, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, शैलेश साबळे, इम्तियाज अत्तार, नितीन शिंदे, अनिल दवंगे, अमित आगलावे, अशोक गायकवाड, करंजी एकलव्य संघटनेचे तालुका सचिव संभाजी आहेर, ज्ञानदेव आहेर, सुनील गायकवाड, अनिल गायकवाड, केशव पवार, राजु आहेर, वाल्मिक निकम, भरत जगताप,मढी बु. चे सरपंच प्रवीण निंबाळकर, निवृत्ती गवळी, अनिल गवळी, निसार सय्यद, आसिफ सय्यद, मगबुल सय्यद,भैय्या सय्यद, सादिक सय्यद, मस्तान सय्यद, शहाबुद्दीन सय्यद, चितळी येथील मौलाना सरताज काझी, मौलाना आमीन शेख, मौलाना शाहबाज मिफताई, दिपक वाघ, बाबासाहेब वाघ, नितीन वाकचौरे, रुपेश गायकवाड, तौफिक कुरेशी, मोसीन चौधरी, नुमान कुरेशी, फिरोज शेख, रसूल शेख, दादा शेख, समीर चौधरी, जावेद बागवान, ख्वाजा शेख, जावेद पठाण, शौकत शेख, सलिम शेख, हुसेन पठाण, जावेद सय्यद, सांडू सय्यद, आयुब शेख, महेबुब तांबोळी, अमजद शेख, सिकंदर पठाण, लियाकत शेख, गुलाब इनामदार आदी उपस्थित होते.                            

Leave a Reply

You cannot copy content of this page