शनि मंदिर कोपरगावात रामलिला कथा सुरू

शनि मंदिर कोपरगावात रामलिला कथा सुरू

Ramlila Katha begins in Shani Mandir Kopargaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 27July, 18.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव  : शहरातील गोदावरी नदी काठाशेजारील शनि मंदिरात तालुक्यातील उक्कडगांव व श्रीरामपुर स्थित तुलसीराम चरित मानस रामलिला मंचाने ग्रामिण कलाकारांमार्फत आठ दिवसीय रामलिला सप्ताह निशुल्क कथेची सुरूवात झाली असल्याची माहिती संजय सिंग व शामकुमार श्रीवास्तव यांनी दिली.  ही कथा दररोज रात्री ८ वाजता सुरू होते तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या रामलिला कलेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.         

सप्ताहभर चालणा-या कथेत सिता स्वयंवर, सिताहरण, लंका दहन, लक्ष्मण शक्ती, मेघनाथ रावण वध आणि रामराज्य असे भाग सादर होत आहेत.         

  या रामलिला कथेत लखनभाई, लक्ष्मण कटारे, राकेश उपाध्याय, रवी यादव, राजेंद्र शर्मा, सुरेश गवळी, संजय दास व धनंजय तिवारी हे सह कलाकार म्हणुन काम करत आहे., या रामलिलाचे प्रयोग महाराष्ट्र राज्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेशातही झालेले आहेत. या राज्यातील हौशी कलावंतांनी रामलिला कलेचे कौतुक करत त्यांना सहकार्य केलेले आहे.         

  आज जग अभासी माध्यमामध्ये मोठया प्रमाणांत गुंतलेले अहे. तरूणपिढी इतिहास वाचून समजून घेत नाही त्यामुळे त्यांच्यापुढे अनेक छोटे छोटे प्रश्न निर्माण झालेले आहे. युवा पिढीला इतिहासाची माहिती व्हायला पाहिजे त्यासाठी रामलिला कथेत काही प्रमाणांत कलेच्या माध्यमांतुन तो जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न आहे असे संजय सिंग व शामकुमार श्रीवास्तव म्हणाले.         

   ज्येष्ठ समाजासेवक आण्णा हजारे यांनीही रामलिला कलेचे कौतुक करून ही कला जीवंत रहावी यासाठी केंद्र व राज्य स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. कोरोनामुळे दोन वर्षे आमच्या कलाकारांचे अत्यंत हाल झाले.           

शासनाने ही कला जीवंत ठेवण्यासाठी मोठया प्रमाणांत आर्थीक सहकार्य केले पाहिजे त्यासाठी विविध राजकीय पक्ष व त्यांचे सहकारी प्रयत्न करत आहेत. कोपरगांवच्या परिसराला ऐतिहासिक प्राचिन वारसा असुन येथे भगवान श्रीरामप्रभुंचा चौदा वर्षे वनवासातील काही काळ व्यतित झालेला आहे. कोपरगांव ही भूमि संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. त्या नगरीत रामलिला सादर करणे हे आम्हा कलाकारापुढे एक आव्हान असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page