ग्लासगो (स्कॉटलंड) जागतिक सहकार परिषदेत संदीप कोयटेकडून देशाचे प्रतिनिधित्व – राजेश ठोळे

ग्लासगो (स्कॉटलंड) जागतिक सहकार परिषदेत संदीप कोयटेकडून देशाचे प्रतिनिधित्व – राजेश ठोळे

Representation of the country by Sandeep Koyte in Glasgow (Scotland) World Co-operative Conference – Rajesh Thole

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 29July, 18.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : ग्लासगो (स्कॉटलंड) जागतिक सहकार परिषदेत संदीप कोयटेकडून देशाचे प्रतिनिधित्व केले असल्याचे गौरव उद्गार उद्योजक राजेश ठोळे यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले. जगभरातील पतसंस्था चळवळीकडून झालेला गौरव हा केवळ समता व बँकिंग चळवळीला अभिमानास्पद आहे. असेही ते म्हणाले, अध्यक्षस्थानी कोपरगावचे जेष्ठ अर्थतज्ञ अशोक अजमेरे हे होते.

समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी स्कॉटलंड येथे १७ ते २० जुलै २०२२ दरम्यान ६७ देशातील पतसंस्थांच्या जागतिक सहकार परिषदेत समता पतसंस्थेच्यावतीने भारत देशाचे प्रतिनिधित्व केले राजेश ठोळे बोलत होते. संदीप कोयटे म्हणाले की, जगभरात पतसंस्था चळवळ आहे. पतसंस्था चळवळ परदेशात क्रेडिट युनियन या नावाने ओळखली जाते. वर्ल्ड ऑर्गनायझेशन को-ऑप क्रेडिट युनियन ही संस्था परदेशात कार्यरत आहे.या जागतिक संघटनेकडून मला ग्लासगो (स्कॉटलंड) या ठिकाणी समता पतसंस्थेच्या वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? याविषयी समता पतसंस्था व भारत देशाचे प्रतिनिधत्व करत सादरीकरणाची संधी मिळाली.विशेषतः क्यू.आर कोडचा वापर जगभरात फारसा होत नाही,जगभरात क्रेडिट व डेबिट कार्डचा वापर अद्यापही मोठ्या प्रमाणात होत आहे.परंतु भारतात समता पतसंस्थेने १५ हजाराच्या वर दुकानांमध्ये क्यू.आर.कोड बसवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले आहे.याबद्दल जगभरातील पतसंस्था चळवळीकडून अभिनंदन होत आहे. परंतु परदेशातील बँकिंग चळवळीमध्ये सुरू असलेली निओ बँकिंग संकल्पना ही भारतात अद्याप आलेली नाही.पण निओ बँकिंग च्या माध्यमातून भारतात ब्रंच लेस बँकिंग ही संकल्पना मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकते. त्यामुळे भारतातील सहकार चळवळीतील पतसंस्थांनी केवळ शाखा उभारणीवर अधिक भर न देता ब्रांच लेस बँकिंग संकल्पनेचा अभ्यास करून ती अमलात आणण्याचा प्रयत्न करावा.असे आवाहन संदीप कोयटे यांनी केले.

अशोक अजमेरे म्हणाले की,समता पतसंस्थेने सोनेतारण कर्ज वाटपात केलेल्या उच्चांकाबद्दल आनंद व समाधान वाटत आहे. समता पतसंस्थेने सोने तारणात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून खाजगी कंपन्यांना ही लाजवेल अशा प्रकारचे काम करत असल्यामुळे समताच्या ठेवी अधिकाधिक सुरक्षित झाले आहे.समता पतसंस्थेच्या प्रत्येक सेवकांमध्ये बदल स्वीकारणे ही वृत्ती असल्याने आज समता प्रगतीकडे वाटचाल करत आहे.तसेच समताच्या प्रत्येक सेवकाने ज्ञानाने अधिक परिपक्व होत संदीप कोयटे यांच्या तरुण नेतृत्वाखाली संस्थेची अधिक प्रगती करावी.
 अनुप पटेल मनोगत म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही बदलत्या काळानुसार गरजेची बाब आहे, पण या अत्याधुनिक तंत्रज्ञानात फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहे त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक जपून केला पाहिजे.

प्रसंगी राजेश ठोळे, अशोक अजमेरे, समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे, रामचंद्र बागरेचा, चांगदेव शिरोडे, जितुभाई शहा, गुलशन होडे,संचालिका सौ शोभा अशोक दरक, अशोक दरक, दिपक अग्रवाल, किरण शिरोडे, अनुप पटेल तसेच समता पतसंस्थेचे मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी केले उपस्थितांचे आभार ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page