पोहेगांवचे आणि सरला बेटाचे नाते फार जुने – महंत रामगिरी महाराज
The relationship between Pohegaon and Sarla Island is very old – Mahant Ramgiri Maharaj
पोहेगांवात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगताEnd of Akhand Harinam week in Pohegaon
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 27July, 17.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : पोहेगांवचे व सरला बेटाचे नाते फार जुने असून ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांचा सहवास या गावाला लाभला आहे असे प्रतिपादन सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी पोहेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात काल्याचे किर्तननात केले.
पोहेगांव सर्व क्षेत्रात निपुण असून सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्याबरोबर पोहेगावची मंडळी कायम सहभागी व्हायची. ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू ठेवून चांगलं काम केलं आहे. दुसऱ्याच्या सुखाचा नाश करणाऱ्यांची प्रवृत्ती म्हणजे कंस तर दुसऱ्याला आनंद देतो तो नंद कृष्णाने अवतार घेऊन कंसाचा नाश केला त्यामुळे धर्माचं रक्षण झाले. कथा प्रवचन ज्ञानेश्वरी पारायणाने अज्ञानाची काजळी जळून जाते. ज्ञान प्राप्त होते
.यावेळी शिवसेनेचे नितीन औताडे, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापु कोते, स्वाधी.शारदानंदगिरी महाराज, मधु महाराज, सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, डाऊचचे सरपंच संजय गुरसळ, अभिषेक आव्हाड, ग्रा.प.सदस्य राजेंद्र औताडे, संचालक डी पी औताडे, अशोकराव नवले, गोरक्षनाथ औताडे, एम. टी. रोहमारे, साईनाथ रोहमारे, निवृत्ती औताडे,कचेश्वर डुबे, निवृत्ती शिंदे, दादासाहेब औताडे, रमेश झांबरे, आप्पासाहेब औताडे, अशोकराव औताडे, नानासाहेब औताडे, मधुकर औताडे, राजेंद्र कोल्हे, रमेश औताडे, रावसाहेब औताडे, साहेबराव गोरे, सुदाम मोरे, मधुकर पोटे, दिनकर औताडे, अर्जुन पवार, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र मोराडे, चांगदेव कांदळकर, रघुनाथ देवडे, गजानन वाघ, प्रकाश औताडे, प्रकाश रोहमारे, निवृत्ती जोंधळे, शंकर वाघ, किशोर वाघ, श्रीहरी घोटेकर, बाबुराव वाघ, नवनाथ पवार, चंद्रकांत औताडे, कारभारी रोहमारे , चांगदेव कांदळकर अदीसह भजनी मंडळ ग्रामस्थ व सप्ताह कमिटीतील सदस्य उपस्थित होते.महंत रामगिरी महाराज यांचा सत्कार संत पुजन शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी ग्रामस्थांच्यावतीने केले. नितीनराव औताडे यांनी अखंड हरिनाम सप्ताहा साठी रोख व वास्तुरूप स्वरूपात देणगी देणाऱ्या देणगीदारांचे आभार मानत पोहेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा पुढेही चालू ठेवली जाईल असे सांगितले.हजारो भाविक मंहंत रामगिरी महाराज यांच्या कीर्तनासाठी उपस्थित होते. महिला भाविकांची या कार्यक्रमासाठी लक्षणीय गर्दी होती. कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.