माहेगाव देशमुखमध्ये मांडूळ सापाला सर्पमित्राने दिले जीवदान
In Mahegaon Deshmukh, Mandul snake was given life by a snake charmer
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 31July, 19.50
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील संतोष जाधव यांच्या घरात निघालेले चार फुट लांबीचे बिनविषारी मांडुळ कोळपेवाडी येथिल सर्पमित्र रमेश भोंगळ यांनी पकडून कोपरगाव वन विभागाच्या ताब्यात देऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे.
हवामानातील बदलामुळे व भक्ष शोधण्यासाठी विषारी – बिन विषारी साप मानवी वस्तीत शिरल्याच्या गेल्या महिन्याभरात अनेक घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, एका दिवसात चार ते पाच सापांना सर्पमित्र शिवाजी व रमेश भोंगळ हे जीवदान देत आत्ता पर्यंत एक हजारा च्या पुढे विषारी निमविषारी साप निसर्गात मुक्त केलेले आहे.
ग्रामीण भागात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यातच जिल्ह्यात अचानक वातावरण बदलल्याने बिळातून विषारी, बिन विषारी साप भक्ष शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसापासून वाढल्या आहेत. कुठेही मानववस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना याची माहिती तत्काळ देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
अहमदनगर जिल्ह्यात एकाच महिन्यात तिस ते चाळीस लोकांना सर्पदंश झाल्याची सरकारी आकडेवारी सांगते. सापाविषयी समाजात पुर्वापार चालत आलेल्या अंधश्रद्धे विषयी वैज्ञानिक जागृती करत सापाचे निसर्गातील महत्त्व पटवून देत पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांपासुन घ्यावयाची काळजी या विषयी प्रबोधन केले व साप न मारण्याची शपथ घेतली.
चौकट
मांडूळ सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे.मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे. लालसर किंवा तपकिरी रंग, पोटाचा रंग फिकट तपकिरी.तोंड व शेपटी आखूड.डोळे लहान,बाहुली उभी.जमिनीत राहणारा. तोंड शरीराच्या मानाने बारके असल्यामुळे मातीत,वाळूत सहज शिरता येते. भक्ष्याभोवती विळखा घालून भक्ष्याचा जीव गेल्यावर भक्ष्य गिळतो.- सर्पमित्र रमेश भोंगळ कोळपेवाडी