आजी-आजोबांच्या संस्काराचे ज्ञानार्जन शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना द्यावे – मिस्टर मेरी.

आजी-आजोबांच्या संस्काराचे ज्ञानार्जन शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना द्यावे – मिस्टर मेरी.

Educational institutions should provide students with the knowledge of ancestral rites – Mr. Mary.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 31July, 19.40
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव: ज्ञान-विज्ञानातून आपण एकविसाव्या शतकात प्रगतीची झेप घेत आहोत त्यात कुटुंब व्यवस्थेतील आजी-आजोबा घटक महत्वाचा आहे, आजी आजोबांनी दिलेले संस्कार पुढे टिकावे यासाठी सर्व शिक्षण संस्थांनी ही संस्काराची शिदोरी टिकविण्यांचे शिक्षण ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यावे असे आवाहन सेवा निकेतनच्या व्यवस्थापिका सिस्टर मेरी कर्वालो यांनी पाल्यांचे आजी-आजोबा विशेष आमंत्रीत सत्कार कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलताना केले.

प्रारंभी प्राचार्य सिस्टर जॉयलेट परेरा यांनी उपस्थितींचे स्वागत करून आजी आजोबा दिवस का साजरा करावयाचा याची माहिती दिली.        याप्रसंगी उपस्थित पालकांनी मनोगतात शाळेचे कौतुक करून कुटुंब व्यवस्थेत आजी आजोबा यांचे महत्त्व स्पष्ट केले.               

श्रीमती सिस्टर मेरी कर्वालो पुढे म्हणाल्या की, आजी आजोबा यांच्यामुळे संस्कृतीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जतन करून पुढे चालविला जातो. जेष्ठ नागरीकांमुळेच आज भारतीय संस्कृती टिकून आहे. ते कुटुंबाचा आधारस्तंभ आहे, दिवसेंदिवस कूटुंब व्यवस्था मोडकळीस येताना आपण बघत आहात याचे एकमेव कारण म्हणजे विभक्त कुटुंब पद्धत. घरातील आजी आजोबांमुळे कुटुंब एकत्र राहण्यास, ठेवण्यास हातभार लागतो. नातवांना देखील त्यांच्या प्रेमाची सतत गरज असते.            

प्रास्ताविक सौ. शिराली शेख यांनी केले. सूत्र संचालन सौ. वसीमा शेख व सुशांत म्हस्के यांनी केले. तर क्रीडा शिक्षक रमेश येवले यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page