भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांना डोळे तपासण्याची गरज – सुनील गंगुले
BJP city president Datta Kale needs to get his eyes checked – Sunil Gangule
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 31July, 20.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : ज्यांनी पाच वर्ष सत्ता असताना जिरवा जिरवी चे राजकारण करून आभासी जगात जगणाऱ्यांना बाहेर काढण्याचे काम मतदारांनी केले ना. आशुतोष काळे यांनी अडीच वर्षात अनेक विकास कामे केली पाच नंबर साठवण तलावाचे काम सुद्धा सुरू झालेले आहे. मात्र ते दिसत नसेल तर भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांना डोळे तपासण्याची गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
महाविकास आघाडीची सत्ता असताना अडीच वर्षात ना. आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलावासह शहरासाठी अतिरिक्त ३.३२ द.ल.घ.मी. पाणी यांनी मंजूर करून घेतले आहे.जवळपास १००० कोटीच्या वर निधी आणून मतदार संघाचा कायापालट करून दाखविला. कोपरगावचा पाणी प्रश्न सुटू नये दत्ता काले यांच्या नावे न्यायालयात खोटी याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने दत्ता काले यांना तंबी देवून याचिका मागे घेण्यास सांगितले होते. विरोधक राजकीय पोळी भाजण्यासाठीच नागरिकांमध्ये संभ्रम करीत असल्याचे गंगुले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मागील अनेक वर्षापासून कोपरगाव शहराला गोदावरी कालव्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत होणारा पाणी पुरवठा शुद्धच होता व भविष्यात देखील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिक समाधानी आहेत मात्र विरोधक धास्तावले असल्याचा आरोप गंगुले यांनी शेवटी केला आहे.