ना.आशुतोष काळेंच्या वाढदिवशी कोपरगावात विविध कार्यक्रम
Various programs in Kopargaon on the birthday of No. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 3 Aug, 18.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव :श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कोपरगाव रन फॉर हेल्थ मॅरेथॉन २०२२ अहिंसा स्तंभ मेन रोड येथे सकाळी ७.०० वाजता प्रारंभ होणार आहे. त्सेच्ग राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये रविंद्र राऊत यांचे वतीने लायन्स मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन, बाळासाहेब रुईकर यांचे वतीने नायडू गीता प्रशाला विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊ वाटप, कार्तिक सरदार व शुभम लासुरे शालेय वह्या वाटप नायडू शाळा, रमेश गवळी यांचे तर्फे मैले पेंटरजवळ गवंडी गल्ली बाजारतळ येथे जंतू नाशक फवारणी, फकीर महमद कुरेशी दुआ मदरसा हायस्कूल खडकी येथील विद्यार्थ्यांना भोजन/वृक्षारोपण,अक्षय पवार व नितीन शेलार यांचे वतीने खडकी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन, चंद्रशेखर म्हस्के स्कूल यांचेकडून के.बी.पी.विद्यालयातील विद्यार्थ्यांना बॅग वाटप, माजी नगरसेवक मंदार पहाडे व सुनिल शिलेदार यांच्या वतीने बडोदा बँक रोड पंचायत समितीजवळ वृक्षारोपण, नगरपालिका मराठी व उर्दू शाळा माऊली मंगल कार्यालयाजवळील विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांचेकडून शालेय वह्या वाटप, माजी नगरसेवक विरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे यांचेकडून लक्ष्मीनगर येथील न.पा.शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप, फकीर महमद कुरेशी, इम्तियाज अत्तार, नवाज कुरेशी व रवी सोनटक्के प्रभाग क्र. दावल मलिक बाबा दर्गा सुभाषनगर या ठिकाणी मिठाई वाटप करण्यात येणार आहे. या सर्व सामाजिक उपक्रम प्रसंगी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव यांचे वतीने करण्यात आले आहे.