लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी प्रतिभा व लेखणीतून सर्वांना प्रवाहात आणले : विवेक कोल्हे
Democratic Annabhau Sathe brought everyone into the flow with talent and writing: Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 3 Aug, 17.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कुठलेही शिक्षण न घेता आपल्या प्रतिभा व लेखणीच्या माध्यमातून शोषित, पीडितांना दुर्लक्षित घटकांना प्रवाहात आणले. असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त संजीवनी उद्योग समूह कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षiच्या वतीने विवेक कोल्हे यांनी अभिवादन केले त्या प्रसंगी ते बोलत होते.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, कोपरगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणीचा विषय पुढे आल्यानंतर माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी स्वतः अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी वाटेगाव (जि. सांगली) येथे जाऊन त्यांच्या कुटुंबाकडून अण्णाभाऊंचा फोटो मिळवला आणि त्या फोटोवरून अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा तयार करून तो कोपरगावातील मुख्य रस्त्यावर राज्यात सर्वप्रथम बसवला. त्यानंतर राज्यात इतरत्र अण्णाभाऊ साठे यांचे उभारले गेले. ही आठवण अभिवादनप्रसंगी सर्वांना आली.
विवेक कोल्हे यांनी टिळकनगर मित्र मंडळ, हनुमाननगर मित्र मंडळ, जाणता राजा मित्रमंडळ सुभाषनगर, जय लक्ष्मीआई भक्त मंडळ प्रणीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ, क्रांती गुरु सोशल फाउंडेशन, शाखा, अण्णाभाऊ साठे चालक-मालक असोशिएशन, आदी ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.
याप्रसंगी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश दादा घोडेराव, संजीवनी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीपराव नवले, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, भाजपचे माजी गटनेते रवींद्र पाठक, स्वप्निल निखाडे, विनोद राक्षे, रवींद्र रोहमारे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, राजेंद्र बागुल, वैभव आढाव, अविनाश पाठक, सुकदेव जाधव, प्रशांत कडू, विजय चव्हाणके, नितीन पोळ, विवेक सोनवणे, गोपी गायकवाड, दीपक जपे, बाळासाहेब आढाव, अकबर शेख, खालिक कुरेशी, अन्सार शेख, संदीप निरभवणे, संदीप देवकर, सतीश रानोडे, शंकर बिऱ्हाडे, शरद त्रिभुवन, शिवाजी खांडेकर, सोमनाथ म्हस्के, दिनेश कांबळे, दिलीपराव तुपसुंदर, सोमनाथ अहिरे, भैय्या नागरे, प्रभुदास पाखरे, प्रदीप बागुल, उध्दवशेठ विसपुते, बाळासाहेब सोळसे, राजेंद्र साळवे, रवींद्र पोळ, परसराम साळवे, फकिरा चंदनशिव, सुरेश मरसाळे, अमोल बागुल, अर्जुन मरसाळे यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.