संजीवनी पाॅलीटेक्निकचा क्रीश शहा ९६. ४० टक्के मिळवुन जिल्ह्यात प्रथम- अमित कोल्हे
Krish Shah of Sanjeevani Polytechnic 96. First in the district by getting 40 percent – Amit Kolhe
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या निकालात संजीवनीचा उत्कृष्ट निकाल Sanjivan’s Excellent Result in Maharashtra State Board of Technical Education Results
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 4 Aug, 16.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगांवः महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ (एमएसबीटीई), मुंबईने नुकतेच निकाल जाहिर केले असुन यात संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी विभागातील क्रीश अमित शहा याने अंतिम वर्षात ९६. ४० टक्के गुण मिळवुन अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला आहे. तसेच सर्वच विद्या शाखांमधिल प्रथम ते तृतिय वर्षाचे सर्वच निकाल उत्कृष्ट लागले असुन संजीवनी पाॅलीटेक्निकने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. क्रीशच्या यशाने संजीवनी पाॅलीटेक्निकच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की कोविड प्रकोपानंतर एमएसबीटीईने सम सत्रांच्या प्रथमच ऑफ लाईन परीक्षा घेतल्या. यात संजीवनी पाॅलीटेक्निच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत संजीवनी पाॅलीटेक्निक हे शैक्षणिक बाबतीत अग्रेसर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. सम व विषम सत्रांच्या एकत्रित वार्षिक निकालात तृतिय वर्षाच्या काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी विभागात क्रीश शाहने केवळ संजीवनीमध्येच नव्हे तर जिल्ह्यातील सुमारे १७ पाॅलीटेक्निकमधुन प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडवित संजीवनी मधिल शिक्षण पध्दती उत्कृष्ट असल्याचे शिक्कामोर्तब केले. याच विभागात तिसऱ्या वर्षात प्रतिक्षा अशोक पटारे हीने ९५. ९४ टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक पटकाविला तर सुयश राजेंद्र गाढवे याने ९५. ०९ टक्के गुण मिळवुन तिसऱ्या क्रमांकाचा माणकरी ठरला. तृतिय वर्षाच्या मेकॅट्राॅनिक्स विभागात सिध्दार्थ राजेंद्र गायधने याने ९५. ५६ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळविला. निकीता विठ्ठल गंडे हीने ९५. २६ टक्के गुण मिळविले तर प्रेम दिपक गायकवाड याने ९५. ०४ टक्के गुण मिळविले. हे दोघेही अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाने उत्तिर्ण झाले. मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात प्रज्वल वाणी याने ९३. ६४ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळविला. सुरेश कर्जुले व संध्या म्हैस या दोघांनीही प्रत्येकी ९१. ७९ टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक मिळविला तर स्नेहल वहाडणे ही ८८. ८२ टक्के गुण मिळवुन तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात दिव्या तांबे हीने ९२. ४४ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान मिळविला. याच विभागात वेदांत पाटील याने ९०. ११ टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक मिळविला तर निखिल मांडोले याने ९० टक्के गुण मिळवुन तिसरे स्थान पटकाविले. तृतिय वर्षाच्या सिव्हिल इंजिनिअरींग विभागात संकेत नळे याने ८७. ६३ टक्के गुण मिळवित पहीला क्रमांक मिळविला. मयुर पवार व तेजस दारूंटे यांनी अनुक्रमे ८६. ७९ व ८६. ११ टक्के गुण मिळवुन दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. व प्रथम वर्षांचे निकाल पुढील प्रमाणे. अनुक्रमे प्रथम, दुसरा व तिसरा क्रमांक. कंसातील आकडे शेकडा गुण दर्शवितात . द्वीतिय वर्ष काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी विभाग-प्रतिक्षा चांदर (९४), समृध्दी बोरावकेे (९०. ५३) अक्षदा फोपसे (८९. ९३), मेकॅट्राॅनिक्स विभाग-यशश्री चौधरी (९२. ३८), जागृती शेळके (८९. ६२), रितेश औताडे (८९.४१), इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग-चैतन्य खरात (८१. २२), विनय संवत्सरकर (८०. ७०), हर्षदा पवार (८०. ६४), सिव्हिल इंजिनिअरींग विभाग-सुहानी सोमासे (८३. ७६), श्रेया कुलकर्णी (८१. ८८), अनुजा सांगळे (७९. ८८), मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग- मंगेश लव्हाळे (८४. ८६), राजा कुमार (८३. ६६), पुर्वा अनिल भोंगळे (८१. ८९). प्रथम वर्ष काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी विभाग-संस्कृती पाटील (९४. १३), प्राजक्ता औताडे (९१. २५), गौरी लंके (९०. ८८), मेकॅट्राॅनिक्स विभाग-अथर्व वाघमारे (८९. १०), आकांशा नागपुरे (८७. ७९), मयुरी वावळे (८७. ५२), इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग- सिध्दी वाकचौरे (८९. ७३), लीना भोई (८४. २०), शुभम कातकडे (८३. ९३), सिव्हिल इंजिनिअरींग विभाग-परूण चौधरी (९२. ०६), हर्षल परजणे (९१. ८७),अक्षय औताडे (७५. ९३), मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग-भावी चौहान (८५. ५९), संजना चांदर (८४. ९०), पद्मश्री बोळीज (८३. ५९). तृतिय वर्षातील पहिल्या क्रमांकाने उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अमित कोल्हे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, विभाग प्रमुख प्रा. गिरीश वट्टमवार, प्रा. गणेश जोर्वेकर, प्रा. प्रविण खटकाळे व प्रा. मोहिनी गुंजाळ उपस्थित होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीन कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनीही सर्व गुणवंत विध्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.