विविध सामाजिक उपक्रमांनी ना. आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा

विविध सामाजिक उपक्रमांनी ना. आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा

Various social activities no. Birthday celebration of Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 4 Aug, 19.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात   साजरा केला.

यामध्ये कुंभारी मध्ये ग्रामस्थांच्या वतीने ऐतिहासिक व पौराणिक राघवेश्वराच्या अतिप्राचीन मंदिरात कुंभारी ग्रामस्थांनी भल्या पहाटे महाअभिषेक करून ना. आशुतोष काळे यांना उदंड निरोगी आयुष्य लाभावे यासाठी सामुहिक प्रार्थना करण्यात आली. तसेच पावसाळा सुरु असल्यामुळे रोगराई पसरू नये व नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी गावामध्ये जंतुनाशक फवारणी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले डाऊच बु. मध्ये देखील ग्रामस्थांनी वृक्षारोपण केले तसेच हिंगणी मध्ये देखील वृक्षारोपण करून तुकाराम बाबा मंदिरात महाअभिषेक करण्यात आला.

हिंगणी मध्ये देखील वृक्षारोपण करून तुकाराम बाबा मंदिरात महाअभिषेक करण्यात आला.

कोळगाव थडी, मंजूर, चासनळी, वडगाव, काकडी, अंजनापूर, जेऊर, कुंभारी या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले. धामोरी येथे अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व  उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व बिस्किटाचे वाटप करण्यात आले.

मळेगाव थडी येथे बचत गटाच्या महिलांना परस बागेसाठी भाजीपाला बियाण्याचे वाटप करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करून वृक्षारोपण करण्यात आलेचास नळी येथील मारुतराव तिडके पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सोनारी मध्ये देखील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व रवंदे येथील शिवशंकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. देर्डे चांदवड येथे पशु संवर्धन मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

एकूणच कोपरगाव मतदार संघात गुरुवार (दि.०४) रोजी सामाजिक उपक्रम राबविले जावून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण, गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, समाजोपयोगी विविविध मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करून ना. आशुतोष काळेंचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व गावातील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी प्रत्येक गावातील ज्येष्ठ, युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असल्याचे दिसून आले.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page