सप्ताह सेवेत आत्मानंदाची प्राप्ती – ना. आशुतोष काळे
Achieving Atmananda in Week Seva – No. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 5 Aug, 17.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : प.पु.ब्रम्हलीन योगीराज गंगागिरीजी महाराज सराला बेट व योगीराज प.पु.तुकाराम बाबा खेडलेकर या दोनही योगिराजांच्या सेवेचे भाग्य लाभलेले व सांप्रदायाविषयी अंतरंगातून आत्मीयता असलेले माजी खासदार कर्मवीर शंकरराव व स्व. सौ. सुशीलामाई काळे यांची वंश परंपरा माजी आमदार अशोकराव काळे यांनी चालवून सांप्रदायाची पताका पुढे नेली आहे.तोच वारसा मला पुढे चालवायला मिळतो हे माझे परमभाग्य आहे. हा वारसा पुढे चालवतांना १७४ वर्षाची परंपरा असलेल्या योगीराज गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहात मला सेवा करण्याची संधी मिळते यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या अखंड हरीनाम सप्ताहात केलेल्या सेवेतून आत्मानंदाची प्राप्ती मिळत असल्याचा अनुभव ना. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.
प.पु.ब्रम्हलीन योगीराज गंगागिरीजी महाराज यांनी १७४ वर्षापूर्वी अखंड हरीनाम सप्ताहाची सुरु केलेली परंपरा आजतागायत सुरु असून १७५ वा अखंड हरीनाम सप्ताह कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे सुरु आहे. हा सप्ताह सुरु झाल्यापासून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी आपल्या दैनंदिन व्यस्त कार्यक्रमातून सप्ताह सोहळ्याच्या कार्यक्रमात स्वत:ला झोकून दिले आहे. सामान्य भाविकांप्रमाणे वाट्याला आलेली सेवा ते मनोभावे करून या अखंड ज्ञान यज्ञ सोहळ्यात मिळालेल्या पुण्याच्या शिदोरीतून मतदार संघाच्या विकासासाठी साधू संताचे आशिर्वाद घेत आहे.
अखंड हरीनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पंगतीत भाविकांना प्रसाद वाटप करून इतर भाविकांप्रमाणे जमिनीवर बसून ना. आशुतोष काळे यांनी प्रसादाचा लाभ घेतला यावरून त्यांचा साधेपणा दिसून येत आहे. साधू संताच्या चरणाच्या सेवेला अनन्यसाधारण महत्व असून त्यासाठी अंतरंगातून ओढ असणे हे दिखील अत्यंत महत्वाचे आहे. जगद्गुरू संत तुकोबाराय आपल्या अभंगातून सांगतात, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा,देव सोयरा दिनाचा, आपल्या वैभवे शृंगारावे निर्मळे, तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे या उक्तीप्रमाणे हरिनामाची गोडी निर्माण झाल्यावर कितीही मोठी व्यक्ती असली तरी ती व्यक्ती भगवंत सेवेत स्वत:ला अर्पित करते. त्याप्रमाणे ना.आशुतोष काळे यांना देखील हरिनामाची गोडी लागली असून त्यांनी अखंड हरीनाम सप्ताहात भाविकांच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यामुळे भक्तांना पंगतीत वाढण्याबरोबरच प्रसादालयात सुरु असलेल्या प्रसाद तयार करण्यासाठी देखील ते सहभागी होत आहेत आणि या भक्ती सागरात सेवा करून आत्मानंद मिळवीत आहे.