ना.आशुतोष काळेंनी केले रामगिरी महाराजांचे सपत्नीक पूजन  

 ना.आशुतोष काळेंनी केले रामगिरी महाराजांचे सपत्नीक पूजन

No. Ashutosh Kale performed conjugal puja of Ramgiri Maharaj

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu
4 Aug, 18.10
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे प.पु. योगीराज गंगागिरी महाराज यांचा १७५ व्या अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्यामध्ये श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी सपत्नीक ह.भ.प. रामगिरी महाराज यांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

धार्मिक परंपरेचा वारसा असलेल्या काळे परिवाराचा धर्मिक वारसा ना. आशुतोष काळे समर्थपणे पुढे चालवीत आहे. त्यांच्या हातून कोपरगावच्या विकासाचे कामे होत आहेत. उच्च शिक्षित असलेले ना. आशुतोष काळे हे या धर्मिक कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहतात. सप्ताह कमिटीला सप्ताह सोहळ्यात सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती घेवून सर्वोतोपरी सहकार्य करीत आहे. हि अतिशय आनंदाची बाब आहे. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे व स्व. सौ. सुशीलामाई काळे यांना देखील साधू संताविषयी आपुलकी व प्रेम होते. त्यांनी अनेक धार्मिक कार्यक्रमासाठी नेहमीच मोठी मदत केली आहे. तेच धार्मिक कार्य माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील पुढे चालविले असून काळे परिवाराचा धार्मिक वारसा चालविणाऱ्या ना. आशुतोष काळे यांच्या हातून मतदार संघाच्या विकासा बरोबरच धार्मिक कार्यात ते सहभागी होत असल्याचा आनंद वाटत असल्याचे ह.भ.प.रामगिरी महाराज यांनी यावेळी सांगितले व त्यांना पुढील कार्यासाठी आशिर्वाद दिले. यावेळी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष तथा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, उपाध्यक्ष संभाजीराव रक्ताटे, सदस्य महेश लोंढे, विजयराव थोरात, विजयराव रक्ताटे, उपसरपंच दीपक रोहोम, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, सुनील लोंढे, विजयराव रक्ताटे आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट :-  श्री क्षेत्र कोकमठाण येथे सुरू असलेल्या १७५ व्या अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्या मध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमाप्रसंगी ना. आशुतोष काळे हे सप्ताह सुरु झाल्यापासून आवर्जून उपस्थित राहत आहेत.  गुरुवार (दि.४) रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे सप्ताह कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचे नियोजन करण्यात येवून ह.भ.प. रामगिरी महाराज यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला.

 

                  

                  

Leave a Reply

You cannot copy content of this page