पतसंस्था चळवळ ; केंद्र व राज्य सरकारने युवकांच्या सहभागासाठी प्रयत्न करावे- काका कोयटे
Credit Union Movement; Central and state government should try for the participation of youth – Kaka Koyte
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 13 Aug, 19.20
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : सहकार चळवळीमध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विशेष प्रयत्न करावे. असे मत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी शिर्डी येथे युवा सहकार परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवा सहकार परिषदेच्या उद्घाटन बुलढाणा चिखलाच्या आमदार सौ.श्वेता महाले यांनी केले.
यावेळी काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली
या परिषदेत पतसंस्था संचालक मंडळात युवा संचालकांसाठी राखीव जागा, ट्रेनी संचालकांची ही निवड, युवक सभासदांचे प्रमाण जास्त असलेल्या संस्थेला लेखापरीक्षणात विशेष गुण द्यावेत. युवक सभासदांच्या ठेवीवर जास्त व्याजदर द्यावा, संस्थेच्या होणाऱ्या तोट्याला संचालक मंडळाला जबाबदार धरले जाते, त्याप्रमाणे त्या संस्थेच्या नफ्यात देखील संचालकांचा सहभाग असावा म्हणजे बिझनेस करिअर म्हणून देखील युवा पिढी पतसंस्थांकडे आकर्षित होतील. आदी ठराव मंजूर करण्यात आले.
यावेळी आ. सौ.श्वेता महाले म्हणाल्या,
केंद्र व राज्य शासनाच्या सहकार खात्याने महाराष्ट्र पतसंस्था व देशातील सहकार चळवळीत युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे विशेष प्रयत्न करण्याची मागणी करणार असल्याची ग्वाही दिली.
तसेच अलिबाग येथील आदर्श पतसंस्थेचे युवा संचालक अभिजीत पाटील यांनी पतसंस्था चळवळीत मार्केटिंग चे महत्व, व्यंकटेश मल्टीस्टेट पतसंस्थेचे युवा संचालक अविनाश शिंदे यांनी पतसंस्था चळवळीत आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व, कोपरगाव तालुक्यातील समता नागरी सहकारी पतसंस्थेचे युवा संचालक यांनी मी अनुभवलेली स्कॉटलंडची स्कॉटलंडची सहकार परिषद तर कोल्हापूर पिहिताश्रव पतसंस्थेचे युवा संचालक रमेश मिठारे यांनी पतसंस्था चळवळीत कर्मचाऱ्यांचा सहभाग या विषयाच्या अनुषंगाने उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
प्रसंगी राज्य फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव,अहमदनगर जिल्हा स्थैर्यनिधीचे अध्यक्ष सुरेश वाबळे, कोपरगाव संदीप कोयटे,अलिबाग अभिजीत पाटील, नगर अभिनाथ शिंदे, नांदेड धनंजय तांबेकर, वसई प्रकाश भोईर, माजलगाव रविंद्र कानडे,जालना दिपक तुपकर, नगर अक्षय नवले, नाशिक नचिकेत पाटील, संतोष भंडारी, कोल्हापूर रमेश मिठारे, सांगली संदीप माळी, पुणे तस्लिम शिकलकर आदिंसह महाराष्ट्रातील विविध पतसंस्थांचे युवा चेअरमन,युवा पदाधिकारी, युवा अधिकारी,युवा कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ सुरेखा लवांडे यांनी मानले.
Post Views:
190