सेवा निवृत्तीनंतरही काळे  उद्योग समूहाशी  ऋणानुबंध कायमचे राहतील – आ. आशुतोष काळे

सेवा निवृत्तीनंतरही काळे  उद्योग समूहाशी  ऋणानुबंध कायमचे राहतील – आ. आशुतोष काळे

Debts with kale  industry group will remain forever even after retirement – ​​Aa. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat13 Aug, 19.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : नियमानुसार प्रत्येकाला सेवेतून निवृत्त व्हावे लागते त्यामुळे तुम्ही जरी सेवेतून निवृत्त होत असला तरी कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना, उद्योग समूह व काळे परिवाराशी जुळलेले ऋणानुबंध कायमचे राहतील असा विश्वास चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी सेवा निवृत्त  कर्मचारी व कुटुंबाच्या सत्कार  सोहळ्यात व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, नोकरी करीत असतांना दिनचर्या ठरलेली होती. एका चाकोरीत राहून जीवन जगावे लागते. त्यामुळे सहाजिकच कुठेतरी मन मारून भावनांना आवर घालून आयुष्य व्यक्तीत काराव लागत. मात्र यापुढे चाकोरी बाहेर जाऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करा. राहिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करतांना आपल्या परिवाराला जास्तीत जास्त वेळ द्या. त्याचबरोबर आपल्या तब्येतीची देखील चांगल्या प्रकारे काळजी घ्या व परिवाराने देखील काळजी घ्यावी.

 भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तरी तुमच्या हक्काचा माणूस  समजून तुम्हाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आपण व आपल्या परिवाराने आजवर कर्मवीर शंकरराव काळे , माजी आमदार अशोक काळे यांच्यावर अतोनात प्रेम केले ते प्रेम माझ्यावरही केले. तुमचे काळे परिवारावर असलेले हे प्रेम यापुढेही असेच आबाधित राहू द्या. तुम्ही यापूर्वीही काळे परिवाराचे अविभाज्य घटक होता व यापुढेही काळे परिवाराचे घटक म्हणूनच राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

                 या प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक मा. आ. अशोक काळे, व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सूर्यभान कोळपे, सचिन चांदगुडे, शंकरराव चव्हाण, अनिल कदम, अॅड. राहुल रोहमारे, प्रविण शिंदे, वसंतराव आभाळे, शिवाजीराव घुले, श्रीराम राजेभोसले, दिनार कुदळे, डॉ. मच्छिन्द्रनाथ बर्डे, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, सुरेश जाधव, विष्णु शिंदे, यांचेसह कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक संचालक सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बी. बी. सय्यद, असि. सेक्रेटरी एस.डी. शिरसाठ विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी यांचेसह निवृत्त कर्मचारी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले. सुत्रसंचालन सेक्रेटरी बी. बी. सय्यद यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे यांनी मानले. 

यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परीवाराने आपले मनोगत व्यक्त करतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                .

           

Leave a Reply

You cannot copy content of this page