स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव; ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने तिरंगा सायकल रॅली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव; ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने तिरंगा सायकल रॅली

Nectar Festival of Freedom; Tricolor Cycle Rally on behalf of Rural Police Station

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 13 Aug, 19.10
By
राजेंद्र सालकर

 कोपरगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत  कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने  शनिवारी (१३ ऑगस्ट) रोजी  सकाळी साई तपोभूमी मंदिर पासुन  कोपरगाव शहरातील सर्व चौकातून जात देशभक्ती गीत वाजवून जनजागृती केली व तहसील कार्यालय या ठिकाणी रॅलीचा समारोप केला.  या रॅलीत २५ सायकलस्वार यांनी भाग घेतला व  सुमारे दहा किलोमीटर अंतर पार केलं.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत  कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने ग्रामीण भागातील  मायगावदेवी,  ब्राह्मणगाव जिल्हा परिषद शाळेच्या   विद्यार्थ्यांची प्रभात फेरी व चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी शाळेच्या सहकार्याने  आयोजित केल्या होत्या.स्‍वातंत्र्य महोत्सवाच्‍या अमृत महोत्सवाअंतर्गत ,  मायगाव देवी व ब्राह्मणगाव येथे प्रभात फेरी काढण्यात आली  व चित्रकला निबंध व वक्तृत्व स्‍पर्धा घेण्यात आल्या. यावेळी  कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  दौलतराव जाधव (पोलीस निरीक्षक): विद्यार्थ्यांना बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा व मोटार वाहन कायदा नियम याची महिती दिली.
यावेळी पोलीस इन्स्पेक्टर जाधव पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे पोलीस कॉन्स्टेबल मेढे मेजर संजय जगताप, मुख्याध्यापक पी.बी.आहेर, सचिन सोनवणे, फकीरा वाकचौरे, लहानु बनकर आदी मान्यवर हजर होते.
    या स्पर्धेत लहान गटात  ऋतुजा नवनाथ धाकतोडे,  संस्कृती निवृत्ती माकुणे,  अस्मिता पांडूरंग सोनवणे, मोठा गट रेणुका बाबासाहेब पगारे, सिद्धी संजय जगताप, राज बाबासाहेब लभडे विजेते ठरले.
परीक्षक म्हणून श्रीमती वंदना सोनवणे श्रीमती निर्मला पवार व गोपाळ राजपूत यांनी काम पाहिले सूत्रसंचालन संतोष आहेर यांनी केले तर शेवटी आभार विजय आसने यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page