सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखानन्यावर  ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू 

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखानन्यावर  ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू 

Dnaneshwari Parayan week begins at Sahkar Maharshi Shankarao Kolhe Factory

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 13 Aug, 19.40
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव: तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे याही वर्षी हनुमान मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह मठाधिपती रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते  दिप प्रज्वलन करून सप्ताह प्रारंभ झाला.

           याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, चीफ केमिस्ट विवेककुमार शुक्ला, चीफ इंजिनियर के. के. शाक्य, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, अॅडमिनीस्ट्रेटीव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे, सहायक मुख्य लेखापाल प्रविण टेमगर, रंगनाथ लोंढे यांच्यासह विविध खातेप्रमुख, उप खातेप्रमुख, कर्मचारी, भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. 
         
रमेशगिरी महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माउली ज्ञानेश्वरासह सर्व भावडांनी शेजारच्या पुणतांबा येथील चांगदेवांना ज्ञानाची प्रचिती दाखविलेली आहे. ज्ञानाचा इश्वर या नामस्मरणातच विश्वकल्याणासह तुमचा आमचा भाग्योदय आहे. संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी तालुक्याच्या विकासाबरोबरच अध्यात्मीक क्षेत्रात मोठे योगदान दिले असुन त्यांचा वारसा पुढची पिढी बिपीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे व  कोल्हे साखर कारखान्यांचे युवा अध्यक्ष  विवेक   कोल्हे हे सक्षमपणे पुढे चालवित आहे. स्वामी सहजानंदभारती यांच्या आर्शिवादाने स्व. शंकरराव कोल्हे यांनी या परिसराचा कायापालट केला आहे. कोपरगांव तालुक्याला महान ऐतिहासिक वारसा लाभलेला असुन गोदाकाठी असंख्य संत महंतांनी तपश्चर्या केली असुन त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमि पवित्र आहे. संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमांतून असंख्य गोर गरीबांचे संसार प्रपंच फुललेले आहेत. तीर्थक्षेत्र कोकमठाण येथे नुकताच ऐतिहासिक १७५ वा गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह पार पडला हे देखील कोपरगांव तालुकावासियांचे मोठे भाग्य आहे.
शेवटी अडमिनीस्ट्रेटीव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे यांनी आभार मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page