कोपरगावात आज संजीवनी युवा प्रतिष्ठान दहीहंडीसाठी “चला हवा येऊ द्या” ची श्रेया बुगडे
Shreya Bugde of “Chala Hawa Yeu Yaya” for the Sanjivani Yuva Foundation Dahi Handi in Kopargaon today.
गोविंदा पथकांनो सहभागी व्हा – विवेेक कोल्हे Govinda teams get involved – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 18 Aug, 18.50
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : आगळ्यावेगळ्या कार्यातून केवळ कोपरगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर छाप उमटवणाऱ्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गोपालकाला आणि दहीहंडी उत्सव शुक्रवारी (१९ ऑगस्ट) मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. कोपरगावची शान आणि मान उंचावणारा, समाजप्रबोधनासह सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव “चला हवा येऊ द्या“ फेम सुप्रसिध्द अभिनेत्री श्रेया बुगडे आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व कारखान्याचे अध्यक्ष, विवेक कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे.
कोरोना निर्बंध दोन वर्षानंतर शिथिल झाल्याने दहीहंडी उत्सव सामूहिकपणे साजरा करण्याची संधी मिळाली आहे. ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा आला रे आला…’ चे सूर पुन्हा एकदा ऐकावयास मिळणार आहेत.
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सवाचा थरार शुक्रवारी १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपासून शहरातील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर रंगणार आहे. कोपरगावकरांचे प्रमुख आकर्षण असलेली ही मानाची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये यंदाही मोठी चुरस दिसणार आहे. तरुणाईचा उत्साह वाढविणाऱ्या या दहीहंडी उत्सवाबद्दल नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
कोपरगाव तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे माजी मंत्री, लोकनेते सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी सर्व जाती-धर्मांतील नागरिक बांधवांना बरोबर घेत समाजकारण केले.
स्व. शंकरराव कोल्हे यांचा आदर्श जोपासत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या पावलावर पाऊल ठेवून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांची वाटचाल सुरू आहे. “जागवूया ज्योत माणुसकीची“ या बोधवाक्यातून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते कोल्हे कुटुंबियांचा समाजकार्याचा वारसा पुढे चालवत आहेत.
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि इतर उपक्रम राबविण्यात येतात.
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोपालकाला आणि दहीहंडी उत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यात येतो. हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे ठेवली आहे. मानाची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच उत्साह वाढविण्यासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष स्वराज अशोक लकारे, कार्याध्यक्ष राहुल उत्तमराव खरात, उपाध्यक्ष स्वराज राहुल सूर्यवंशी, अर्जुन भगवान मरसाळे, शैलेश दीपक नागरे, सचिव राहुल जगन्नाथ बहादुरे, दशरथ प्रीतम सरवान, समीर किसन सुपेकर, अनिल रमेश गायकवाड, सहसचिव सचिन फिलीप दिनकर, अल्ताफ मोतीखाँ पठाण, आकाश अंकुश शिरसे, शाम भास्कर शिंदे, संघटक रामचंद्र नामदेव साळुंखे, सतीश कारभारी म्हस्के, विकी गोपाल परदेशी, इलियास इसलाउद्दीन शेख, खजिनदार देविदास साहेबराव बागुल यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व युवासेवक, भाजप पदाधिकारी, विविध संस्थांचे आजी-माजी अध्यक्ष सर्व संचालक, संजीवनी उद्योग समूह संलग्न संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
Post Views:
255