कोपरगांव बाजार समितीत कांदा १४०७ /- रुपये -प्रशासक ठोंबळ
Onion in Kopargaon Market Committee Rs.1407/- -Administrator Thombal
डाळींब २५०/- रुपये किलो Pomegranate Rs. 250/- kg
तर तिळवणी बाजारात कांदा १२६४ /- रुपये
Whereas onion in Tilwani market Rs.1264/-
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu18 Aug, 19.00
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव :कोपरगांव बाजार समितीत गुरुवारी (१८ ऑगस्ट) रोजी ओपन कांद्याला १४०७ /- रुपये भाव मिळाला असुन आवक ११४२० क्विंटल एवढी झाली आहे.
कांदा नंबर १ ला १४०७ /- ते १०७५/- रुपये भाव मिळाला. कांदा नंबर २ ला १०५० /- ते ७५०/- रुपये भाव मिळाला. कांदा नंबर ३ ला ७००/- ते ५०० /- रुपये भाव मिळाला.
डाळींबाची आवक ५४५ क्रेटस झाली असुन २५०/- रूपये प्रति किलो भाव मिळाला.
डाळींब नंबर १ ला २५०/- ते १५०/- रूपये किलो भाव मिळाला. डाळींब नंबर २ ला १४५/- ते ८५/- रूपये किलो भाव मिळाला. डाळींब नंबर ३ ला ८०/- ते ३०/- रूपये किलो भाव मिळाला.
तसेच गुरुवारी भुसार या शेतीमालाचे बाजारभाव खालीलप्रमाणे.
गहु कमाल बाजारभाव २५०१ /- रुपये व सरासरी २४०१/- रूपये भाव मिळाला.बाजरी कमाल बाजारभाव २२००/- रूपये भाव मिळाला. हरबरा कमाल बाजारभाव ४७३४ /- रुपये व सरासरी ४५११/- रूपये भाव मिळाला. सोयाबीन कमाल बाजारभाव ६०१८/- रुपये व सरासरी ५९६१/-रूपये भाव मिळाला मका कमाल बाजारभाव २५८५/- रूपये व सरासरी २५१२/- रूपये भाव मिळाला
तर शिरसगांव-तिळवणी येथील उपबाजारात गुरूवारी (१८ ऑगस्ट) रोजी कांदा आवक ६७४० आली. भाव कांदा नंबर १ ला १२६४ /- ते ६५०/- रुपये भाव मिळाला.कांदा नंबर २ ला ९००/- ते ७००/- रुपये भाव मिळाला. कांदा नंबर ३ ला ६५०/- ते २५०/- रुपये सरासरी भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक एन. जी. ठोंबळ यांनी दिली आहे.
शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी प्रतवारी करुनच शेतीमाल कोपरगांव बाजार समितीच्या मुख्य़ व उपबाजार समिती शिरसगांव-तिळवणी येथे विक्रीस आणावा व आपला आर्थिक फायदा करुन घ्यावा असे आवाहन सचिव एन. एस. रणशुर यांनी केले आहे.
Post Views:
295