म्हाळसाई डिजीटल हॉलचे सौ स्नेहलता कोल्हे यांच्या ते लोकार्पण.

म्हाळसाई डिजीटल हॉलचे सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या ते लोकार्पण.

It was inaugurated by Mrs. Snehalata Kolhe of Mhalsai Digital Hall.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 18 Aug, 18.40
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव : शिक्षणात ग्रामीण भागातील विद्यार्थी डिजीटल क्लास रुमच्या बाबतीत मागे राहू नये या उद्देशाने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष निवृत्ती कोळपे यांनी त्याच्या मातोश्रीच्या स्मरणार्थ म्हाळसाई डिजीटल हॉलची निर्मीती केली त्याचे लोकार्पण गोकुळाष्टमीच्या मुहूर्ताहवर भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पार पडले.

     

 शिक्षण हे वाघाणीचे दुध आहे, ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा निर्माण व्हाव्या यासाठी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने प्रयत्न केले, त्यांचे स्वप्न आज सत्यात उतरत असल्याचेही सौ. स्नेहलता कोल्हे यावेळी बोलतांना म्हणाल्या.
             तालुक्यातील कोळपेवाडी येथील चांगदेवराव बारकू कोळपे माध्यमिक विद्यालयात गुरुवारी डिजीटल हॉल तयार करण्यात आला त्याचे लोकार्पण करताना त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
            प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक राजेंद्र कोळपे यांनी उपस्थीतांचे स्वागत केले. माजी उपाध्यक्ष निवृत्ती कोळपे प्रास्तविक करताना म्हणाले की, शहरी शिक्षण व्यवस्थेच्या तुलनेत ग्रामीण भाग मागे आहे. येथील विद्यार्थ्याना प्रगत तंत्रज्ञान युगात डिजीटल शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजे या उद्देशाने आईची आठवण म्हणून डिजीटल हॉल तयार करण्यात आला त्याचे लोकार्पण सौ. कोल्हे यांच्या हस्ते व्हावे ही आपली इच्छा होती. मुख्याध्यापक सर्जेराव भोसले यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर करून स्थानिक स्कूल कमिटीने आजवर शाळेसाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. 
           याप्रसंगी श्री. चंद्रमोहन पापडेजा, राजेंद्र गोळेचा, सुमनबाई निवृत्ती कोळपे, सागर ढोणे, राजेंद्र देशमुख सिंधुताई मदने, कुस्ती प्रशिक्षक वसंतराव लकडे, शारदाताई कोळपे, पोपटराव जुंधारे, सुखदेवराव कोळपे, शब्बीर भाई शेख, बाबासाहेब कोळपे यांच्यासह सुरेगाव, कोळपेवाडी पंचक्रोशीतील सर्व नागरिक शिक्षण प्रेमी महिला भगिनी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
             सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतात डिजीटल क्रांतीला सुरुवात करून मोठे धाडस दाखविले आहे. विकसीत देशात आपल्या विकसनशील भारताने गुणवत्तेच्या जोरावर मार्गक्रमण सुरू केले आहे. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी देखील शेतकऱ्यांची- गोर-गरीबांची मुले शिकून मोठी हावी हे, स्वप्न उराशी बाळगले. १९८२ पासून त्यांनी त्यादृष्टीने पावले टाकली. आज संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचा मानबिंदू संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटच्या रुपाने सर्वत्र झळकत आहे.
तालुक्याचे माजी सभापती बिपिन कोल्हे यांनी ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणासाठी पडझड झालेल्या शाळा खोल्या दुरुस्त करून शिक्षणाचा आलेख उंचावण्यासाठी कृतीबद्ध कार्यक्रम केला होता. पिढी घडवितांना शिक्षणाला विशेष महत्व आहे. त्यातून समाजाची घडी चांगली बसते. तेव्हा प्रत्येकांने स्मरण राहिल अशा गोष्टींना प्राधान्य द्यावे. निवृती कोळपे यांचे डिजीटल हॉलची संकल्पना तालुक्यात सर्वार्थाने प्रगतीचे पाऊल आहे.
               
या विद्यालयात गेल्या २२ वर्षापासून गोरगरीबांचे २४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्व. चांगदेव बारकू कोळपे यांचा विदयालयाच्या उभारणीत सिंहाचा वाटा आहे. या विदयालयात वेगवेगळ्या स्तरावरील शासकीय तसेच माध्यमिक शालांत परीक्षा मध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलेले आहेत. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य उत्सवानिमित्ताने ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शालेय विद्यार्थ्यांनी स्वागतपर बहारदार कार्यक्रम केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page