कोपरगाव पालिकेने अवास्तव करवाढ मागे घ्यावी अन्यथा आंदोलन करू – संदीप वर्पे
Kopargaon Municipality should withdraw the unreasonable tax hike or else we will protest – Sandeep Varpe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 14 Sep, 19.40 pm
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : नगरपरिषदेने शहरातील नागरिकांच्या मालमत्तेवर केलेली अवास्तव करवाढ मागे घ्यावी अन्यथा आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करू असा इशारा देणारे निवेदन कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपालिकेला देण्यात आले आहे .
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोरोना महामारीचे लॉकडाऊन मुळे आर्थिक मंदीचे सावट आहे ज्यावेळी कोपरगाव नगरपरिषदेने करवाढ करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी त्या निर्णयाला तीव्र विरोध केला होता व आजही या कर वाढीला विरोधच आहे. नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. जर कोपरगाव नगरपरिषदेने केलेली करवाढ मागे घेतली नाही तर कोपरगाव शहरवासीयांच्या समवेत आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू प्रसंगी कायदेशीर लढाई देखील लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच या करवाढीबाबत ज्या नागरिकांची हरकत असेल त्या नागरिकांसाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर मदत केंद्र सुरु केले आहे. त्या ठिकाणी नागरिकांच्या हरकती नोंदवून घेण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या हरकती नोंदवाव्यात असे आवाहन केले आहे.
यावेळी शहराध्यक्ष सुनील गंगूले, गटनेते माजी नगरसेवक विरेन बोरावके यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. हे निवेदन कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी स्वीकारले.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे,कृष्णा आढाव, रमेश गवळी, दिनकर खरे, सुनील शिलेदार, कार्तिक सरदार, राहुल देवळालीकर, राजेंद्र खैरनार, अशोक आव्हाटे, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, आकाश डागा,
इम्तियाज अत्तार, ऋषिकेश खैरनार, शुभम लासुरे, नितीन शिंदे, एकनाथ गंगुले, प्रशांत वाबळे, शिवाजी कुऱ्हाडे, बाळासाहेब शिंदे, महेश उदावंत, गणेश बोरुडे, किशोर डोखे, सचिन गवारे, योगेश नरोडे, फिरोज पठाण, किरण बागुल, मीराताई साळवे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र जोशी, शफिक शेख, रविंद्र वाघडकर, दादा पोटे, अक्षय आंग्रे, मनोज नरोडे, सागर विदुर, चांदभाई पठाण, अक्षय पवार, सुरेंद्र सोनटक्के, संतोष दळवी, अभिषेक मगर आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.