कोकमठाणचा  शिवारात पावसाने  पीके सडली संपूर्ण नुकसान भरपाई द्या  – संभाजी रक्ताटे 

कोकमठाणचा  शिवारात पावसाने  पीके सडली संपूर्ण नुकसान भरपाई द्या  – संभाजी रक्ताटे 

Kokamthan’s crops rotted due to rain in Shivarat, pay full compensation – Sambhaji Raktate

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 14 Sep, 19.50 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव : गेल्या सहा दिवसापासुन सलग पाउस पडत असल्यांने तालुक्यातील कोकमठाण गांवचा संपुर्ण शिवार पावसाच्या पाण्याने तुडूंब भरून भरला असुन शेतातील सोयाबीन, मका, घास, आदि सर्वच पिके सडुन गेली आहेत, शेतक-यांचे खरीप पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले असुन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी शासन यंत्रणेस याची माहिती देवुन भरपाई मिळावी म्हणून मागणी केली आहे, तेंव्हा याकडे तातडीने लक्ष देवुन शेतक-यांना तात्काळ मदत मिळावी असे बाजार समितीचे माजी सभापती संभाजीराव रक्ताटे यांनी म्हटले आहे.

   
   ते म्हणाले की, कोकमठाण शिवारात सध्या नागपुर मुंबई समृध्दी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे असंख्य शेतक-यांच्या शेतातील पाणी निचरा होवुन जाण्यात आडकाठी निर्माण झालेल्या आहेत. संबंधीत शेतक-यांनी समृध्दी महामार्गाचे प्राधिकरण तसेच जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार या यंत्रणेस याबाबतची वेळोवेळी माहिती देवुनही त्यात कुठल्याही सुधारणा झाल्या नाही.
         सप्टेंबर महिन्यात गेल्या सहा दिवसापासुन या परिसरात जोराचा पाउस कोसळत आहे, शेतात गुडघ्याच्या पुढे पाणी साठले आहे, कोकमठाण गांवचा संपुर्ण परिसर बाधीत झालेला आहे. गांवचे तलाठी फक्त पाहुन गेले पण शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत. तहसिलदार विजय बोरूडे यांनाही याबाबतची कल्पना दिली आहे. 
          चालु वर्षी शेतक-यांच्या हातुन खरीपाची पिके वाया गेली, पीके सडल्याने उत्पन्न मिळणार नाही, खरीपासाठी घेतलेले कर्ज, बॅकांकडुन आणलेले पैसे, पत्नीचे दागिने गहाण ठेवुन उपलब्ध केलेल्या पैशाची परतफेड होवुच शकणार नाही, परिणामी त्यांचे मोठे आर्थीक नुकसान झालेले आहे, ते कशानेही भरून येणार नाही. सतत पडत असलेल्या पावसामुळे पशुधनाचेही हाल होत आहे. तेंव्हा मायबाप सरकारने शेतक-यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने धोरणात्मक निर्णय घेवुन शेतक-यांना नुकसानीचे सध्याचे निकष बाजुला ठेवुन आर्थीक मदत करावी जेणेकरून रब्बी पीक लागवडीसाठी शेतक-यांना त्याचा हातभार लागेल असे ते शेवटी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही कोकमठाणच्या शेतक-यांना आधार द्यावा.

Leave a Reply

You cannot copy content of this page