साई संजीवनी बँकेस राज्यस्तरावरील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार – विवेक कोल्हे
State Level Best Bank Award to Sai Sanjeevani Bank – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 14 Sep, 19.30 pm
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या येथील साई संजीवनी बँकेस सलग आठव्यांदा युनिट बँका व शंभर कोटी पर्यंत ठेवी असलेल्या बँक गटात राज्यस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा सर्वोकृष्ट बँक पुरस्कार नुकताच जाहिर झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली.
महाराष्ट्र अर्बन को. ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी व सचिव सौ. सायली भोईर यांनी पुरस्कार निवडीचे लेखी पत्रान्वये कळविले आहे. अडचणींतुन मार्ग काढत साई संजीवनी बँकेने १०० कोटी रूपये ठेवी असणा-या गटात स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र अर्बन को. ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन दरवर्षी राज्यभरातील सहकारी बँकींग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या सभासद नागरी सहकारी बँकांच्या कार्याची दखल घेवुन त्यांना पुरस्कार प्रदान करत असते. बँकेचे संचालक, सर्व ठेवीदार सभासद शेतकरी हितचिंतक यांनी बँक कारभारावर दाखविलेल्या अढळ विश्वासामुळेच बँकेस हा पुरस्कार मिळाल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले. ग्रामिण अर्थकारणाला बळ देवुन सहकारातुन समृध्दी घडविण्यांत कार्यरत असलेल्या बँकांना अधिकाधिक प्रोत्साहन यातुन मिळत असते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी दुरदृष्टीकोनातुन सहकारी साखर कारखानदारी बरोबरच आर्थीक पतपुरवठयासाठी साई संजीवनी को. ऑपरेटीव्ह बँकेची स्थापना केली. त्यातुन शेतक-यांना आर्थीक पाठबळ देत शेती फुलविली आहे. सदरचा पुरस्कार २३ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता महाराष्ट्र अर्बन को. ऑपरेटीव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, उपाध्यक्ष . रमाकांत खेतान, अर्थतज्ञ व सहकार क्षेत्रात अन्य मान्यवरांच्या हस्ते भारतीय क्रिडा मंदिर वडाळा मुंबई येथे प्रदान करण्यांत येणार आहे. साई संजीवनी बँकेचे उपाध्यक्ष रेवजी आव्हाड, संचालक सर्वश्री. नितीनदादा कोल्हे, नारायण अग्रवाल, शरद गवळी, गोरख आहेर, अनिल कोल्हे, संभाजीराव रक्ताटे, अशोकराव टुपके, जयंतीलाल पटेल, सौ. संगिता बापूसाहेब बारहाते, गंगूबाई विश्वनाथ जावळे, मुख्य सर व्यवस्थापक पदमाकर सभारंजक, यांच्यासह सर्व सभासद, विविध क्षेत्रातील पदाधिकारी यासह अनेकांनी युवानेते अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
Post Views:
177