कोपरगाव जंगली महाराज आश्रमामध्ये तीन दिवसीय आयुर्वेद पर्व २०२२- वैद्य रामदास आव्हाड
Three Day Ayurveda Festival 2022 in Kopargaon Jungli Maharaj Ashram – Vaidya Ramdas Awhad
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat17 Sep, 12.50 pm
By
राजेंद्र सालकर
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव वृत्तवेध न्यूज : अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन आयोजित आयुष मंत्रालय, भारत सरकार प्रायोजित आयुर्वेद पर्व २०२२ असे नाव देण्यात आले आहे. या तीन दिवसीय चालणाऱ्या आयुर्वेद पर्व २०२२ मध्ये मोफत आरोग्य तपासणी मोफत औषध देऊन पंचकर्म उपचार केले जातील. औषधी प्रदर्शन रोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत निशुल्करोगी तपासणी शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ असा राहणार असून परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष वैद्य रामदास आव्हाड यांनी केले आहे.
आयुर्वेद पर्व २०२२ चे कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक ज्ञानपीठ विश्वात्मक जंगली महाराज आश्रमामध्ये शुक्रवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान उद्घाटन परमपूज्य जंगलीदास माऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा,सल्लागार आयुष मंत्रालय वैद्य मनोज नेसरी, वैद्य राकेश शर्मा अध्यक्ष अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, वैद्य एस एन पांडे, वैद्य ताराचंद शर्मा, वैद्य शशीताई अहिरे आदी उपस्थित राहणार आहेत .
शुक्रवार २३ सप्टेंबर पासून ते रविवार २५ सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या आयुर्वेद पर्वात आयुर्वेद आहारातून पोषण या विषयावर २० हून अधिक वैज्ञानिकांचे व्याख्याने होणार आहे.२००० आयुष डॉक्टर्स सहभागी होत असून तीन दिवस चालणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात जवळपास १० हजार रुग्णांच्या तपासणीस औषध देऊन पंचकर्म उपचार केले जातील जिल्ह्यातील साधारणता ८० हजाराच्या वर सामान्य नागरिक या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या प्रदर्शन व स्टॉलला भेट देतील असा अंदाज आहे. या सोबतच येथे औषधी वनस्पतीचे प्रदर्शन लागवड त्याचे बाजार मूल्य फायदे याबाबत मार्गदर्शन महाराष्ट्रातील तज्ञ डॉक्टरांचे सामान्य नागरिकांसाठी आहार दिनचर्या आजची जीवनशैली योग मेडिटेशन ते आयुर्वेदातील आयुर्वेदिक औषधापासून ते आयुर्वेदापर्यंतच्या विविध पैलूंवर चर्चा करणार आहेत.
शुक्रवार २३ सप्टेंबर रोजी आयुर्वेद पर्व २०२२ या कार्यशाळा, रुग्ण चिकित्सा शिबिर, स्टॉल, प्रदर्शन यांचे उद्घाटन सकाळी दहा वाजता साडेदहा ते बारा वाजता प्रमुख पाहुण्यांचे हस्ते होणार आहे दुपारी बारा ते एक वैद्य राकेश शर्मा यांचे आयुर्वेद आहार स्वास्थ्य व आधार या दुपारी दोन ते तीन वैद्य साक्षी शर्मा यांचे प्रकृती केस प्रकृती सिद्धांत व्यक्तिगत धारणा आहार यावर दुपारी तीन ते चार वैद्य तपन कुमार वैद्य यांचे दोष धातू मल नियमन व आहार दुपारी चार ते पाच वैद्य मनोज नेसरी सल्लागार आयुष मंत्रालय भारत सरकार पाच ते सहा वैद्य तनुजा नेसरी दीर्घायुष्यासाठी आयुर्वेद
शनिवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते अकरा यामध्ये डॉक्टर के भारती गरोदर माता आहार वैद्य अनुपम श्रीवास्तव आयुर्वेद आहार वैद्य प्रवीण जोशी आयुर्वेद का ट्रिपल अँटीजन, वैद्य नरेंद्र गुजराथी आयुर्वेदानुसार आहार निर्माण प्रात्यक्षिक स्वामी परमानंद जी महाराज ध्यान से आत्मा की पहचान वैद्य ऋषिकेश म्हेत्रे प्रमेय आयुर्वेद चिकित्सा पंचकर्म तथा आहार ओपीडी पंचकर्म प्रात्यक्षिक अध्यापक विशेष संवाद वैद्य तनुजा नेसरी वैद्य निर्जा शर्मा वैद्य बी टी शिंदे वैद्य शिवरत्न शेट्टी शिवचरित्र व्याख्याता छत्रपती शिवाजी महाराज आणि आयुर्वेद वैद्य , आदींचा समावेश आहे.
रविवार २५ सप्टेंबर सकाळी दहा ते अकरा वैद्य एस गोपाकुमार ११ ते १२ वैद्य रामदास आव्हाड दुपारी बारा ते दोन समापन सत्र व पुरस्कार वितरण मुख्य प्रमुख पाहुणे पद्मश्री वैद्य श्री राजेश जी कोटेचा सचिव आयुष मंत्रालय भारत सरकार श्री शशांक सांडू सीईओ सांडू फार्मासिटिकल प्रायव्हेट लिमिटेड २ ते ३ जेवण दुपारी ११ ते १ आयुर्वेद औषधी उत्पादक चर्चा प्रमुख सहभाग वैद्य राकेश शर्मा अध्यक्ष अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन, रणजीत पुराणिक सीईओ श्री धूतपापेश्वर प्रायव्हेट लिमिटेड, शशांक सांडू सीईओ सांडू फार्मासिटिकल प्रायव्हेट लिमिटेड, वैद्य दुर्गाप्रसाद वेलदिंडी सीनियर जनरल मॅनेजर डाबर प्रायव्हेट लिमिटेड याशिवाय प्रमुख आकर्षण आयुर्वेदानुसार आहार निर्माण व नाव औषधी प्रदर्शन औषधी उत्पादनाचे विचार प्रदर्शन रोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत निशुल्करोगी तपासणी शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ असा राहणार असून परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष वैद्य रामदास आव्हाड, महामंत्री वैद्य प्रवीण जोशी, उपाध्यक्ष वैद्य अनिल कुमार दुबे, आयोजक सचिव वैद्य सतीष भट्टड, कोषाध्यक्ष वैद्य शरद दुबे, वैद्य महेंद्र शिंदे, वैद्य अपश्चिम बरंठ , वैद्य विनायक नागरे, वैद्य कौस्तुभ भोईर, वैद्य वैभव गवळी आदींनी केले आहे .
तीन दिवस चालणाऱ्या या आयुर्वेद महोत्सवात निरोगी कसे राहायचे हे आयुर्वेद सांगतो. खाण्याच्या चांगल्या सवयी आवश्यक आहेत. हवामानातील बदलामुळे अनेक आजार होतात. आयुर्वेदाने तो बरा होऊ शकतो. चांगल्या आहारामुळे आरोग्य चांगले राहते.
सर्वसामान्यांचे आरोग्य जपण्यासाठीच्या उपाययोजना, रुग्णांच्या चाचण्या व मोफत उपचार, दैनंदिन जीवनात निरोगी राहण्याचे उपाय याविषयी तज्ज्ञांकडून चर्चा केली जाणार आहे. या परिषदेत महाराष्ट्र, दिल्ली, केरळ , जयपूर , गुजरात या राज्यांसह इतर राज्यांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे
Post Views:
386