आरती कोरडकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

आरती कोरडकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

Awarded Aarti Kordkar State Level Model Teacher Award

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 16 Sep, 15.50 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोरोनाकाळातही ऑनलाइन व ऑफलाईन  शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत नेणाऱ्या नगरपालिका शाळेतील शिक्षिका आरती कोरडकर यांना महाराष्ट्र राज्य न.पा. व मनपा. शिक्षक संघाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार  नुकताच अमरावती येथे प्रदान करण्यात आला.

 शिक्षक आमदार किरण सरनाईक, आमदार रवी राणा,खासदार नवनीत राणा,राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू,आमदार सुलभा कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.
       शैक्षणिक वर्तुळात आरती कोरडकर यांची साहित्यिक, उपक्रमशील, तंत्रस्नेही व विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून ओळख आहे.विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी  तंत्रज्ञानावर आधारित विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात त्या अग्रेसर आहेत.  कोरोना काळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी त्यांनी विविध ऑनलाईन व ऑफलाईन उपक्रम राबविले . शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती,ऑनलाईन टेस्ट ,फ्लिपबुक निर्मिती, बालकाव्याद्वारे विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन घेत आहेत या मुळे कोरोना काळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगल्या प्रकारे सुरू ठेवण्याचे कार्य त्यांनी केले. शाळाबाह्य मुलांना शालेय प्रवाहात आणणे व टिकवून ठेवणे यासाठी बालरक्षक म्हणून त्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.तसेच आपल्या काव्य ,लेख लेखन व रांगोळीतून त्यांनी कोरोनाविषयी जनजागृती केली. कोरोनाकाळात घरोघरी आरोग्य सर्वेक्षणसारख्या  सामाजिक कार्यात सहभागी झाल्या.
     त्या कार्यासाठी त्यांना कोपरगाव नगरपालिकेतर्फे ‘कोरोनायोद्धा’ म्हणूनही सन्मानित केले आहे, त्याचबरोबर मतदार ओळखपत्र वाटप,मतदार जनजागृतीसारख्या कार्यामुळे सर्वोत्कृष्ट बिएलओ म्हणूनही आदरणीय तहसीलदार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
  त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल  आमदार आशुतोष काळे,आमदार सुधीर तांबे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे,प्रशासन अधिकारी तुंबारे,  पटारे , गटशिक्षणाधिकारी शबाना शेख मॅडम ,नपा.मनपा.संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी,सरचिटणीस अरुण पवार, कार्याध्यक्ष अकोलकर सर,कबाडी सर,सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

Leave a Reply

You cannot copy content of this page