कोपरगाव पावणे तीन लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा २४ तासात पर्दाफाश

कोपरगाव पावणे तीन लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा २४ तासात पर्दाफाश

Kopargaon Pawne Gang who robbed Rs 3 lakh busted within 24 hours

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat17 Sep, 13.50 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव  तालुक्याच्या संवत्सर हद्दीतील नऊचारी सोनवणे वस्तीवर मारहाण करून चाकूचा धाक दाखवून दोन लाख ८१ हजार  रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव शहर पोलीस यांनी  २४ तासात तपास करीत तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे

याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी फिर्यादी सौ. कविता अनिल सोनवणे वय ५० रा. नऊचारी, संवत्सर, ता. कोपरगाव यांनी दिनांक १५ रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की, दिनांक १५/०९/२०२२ रोजीचे रात्रीचे ००/४५ वा. चे सुमा ०७ अनोळखी इसमांनी आमचे घराचा दरवाजा चौकटीमधुन गज घालून गजाने व ताकदीने आत ढकलुन घरात प्रवेश करुन माझे पती अनिल हरीभाऊ सोनवणे वय ५४, सासु  सुगंधाबाई हरीभाऊ सोवणे वय ७८ वर्षे, जाऊ सुनिता बबन सोनवणे वय ५२ वर्षे सर्व रा. नऊचारी, संवत्सर, ता. कोपरगाव अशांना गजाने, चाकुने, लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी करुन आमचे घरातील २,८१,५००/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने काढून मोबाईल हिसकावून घेऊन आमचे घराचे दरवाजाला बाहेरुन कडी लावून पसार झाले होते  या प्रकरणी सात अज्ञात व्यक्तींविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात  गुरनं २८७/२०२२ भादविक. ३९५,३९७ प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल केला होता.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे  शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक, मनोहर शेजवळ, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, योगेश घोडके, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विश्वास बेरड, पोलीस नाईक शंकर चौधरी, राहुल सोळुंके, संदीप चव्हाण, दिलीप शिंदे, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, पोकों / रणजित जाधव, रविंद्र घुंगासे, विजय धनेधर, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ संभाजी कोतकर, बबन बेरड, अर्जुन बडे, चापोकों भरत बुधवंत अशांनी वारी, सावळीविहीर, रुई गावाचे शिवारात, ता. कोपरगाव संशयीत आरोपींची माहिती घेत असतांना  अनिल कटके, पोलीस निरीक्षक यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा आरोपी दिलीप विकास भोसले रा. कारवाडी शिवार, कोकमठाण, ता. कोपरगाव याने त्याचे साथीदारांसह केला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी वरील पथकासह आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती काढून कारवाडी शिवार, कोकमठाण, ता. ‘कोपरगाव येथे सापळा लावला. आरोपी मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी असल्याची खात्री होताच पोलीस पथकाने छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहुल लागताच काही इसम पळून जाऊ लागले त्यावेळी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करुन शिताफीने कारवाडी शिवारातून इसम नामे दिलीप उर्फ गिल्या विकास भोसले रा. कारवाडी, कोकमठाण, ता. कोपरगाव  अनिल अरुण बोबडे रा. बेस, ता. राहाता,  राहुल दामू भोसले रा. जेऊर पाटोदा, ता. कोपरगाव अशांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे वरील गुन्हयाबाबत चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचेइतर साथीदारांसह केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करीता कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील कारवाई कोपरगाव शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
यापुर्वी वरील ०३ आरोपींविरुध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत ते पुढील प्रमाणे आरोपी दिलीप उर्फ गिल्या विकास भोसले रा. कार वाडी, कोकमठाण, ता. कोपरगाव याचेवर यापुर्वी अहमदनगर
पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर व कलम१५९/२०२२ भादविक. ३०२, ३९६ १२० (ब)
१ आरोपी २) अनिल अरुण बोबडे रा. वेस, ता. राहाता याचेवर यापुर्वी ठाणे, पुणे, मुंबई रेल्वे या ठिकाणी जबरी चोरी,
राहाता स्वारगेट पुणे मुलुड (ठाणे) बांद्रा रेल्वे दरोडयाची तयारी, चोरी व इतर या सारखे गंभीर स्वरुपाचे असे एकुण १७  गुन्हे दाखल आहेत.
आरोपी  राहुल दामू भोसले रा. जेऊर पाटोदा ता. कोपरगाव याचेवर यापुर्वी  याचेवर यापुर्वी अहमदनगर व औरंगाबाद या ठिकाणी जबरी चोरीचे ०२ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी  जी शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी संजय सातव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page