विकासाच्या आड येणाऱ्या अपप्रवृत्तींना भिक घालत नाही : आ. आशुतोष काळे

विकासाच्या आड येणाऱ्या अपप्रवृत्तींना भिक घालत नाही : आ. आशुतोष काळे

Does not indulge in vices that hinder development: Aa. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon19 Sep, 18.10 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : लोकप्रतिनिधी नात्याने  राजकारण गटतट बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य दिले मात्र विकासाच्या आड येणाऱ्या  अपप्रवृत्तीना  कधीही भिक घातली नाही व यापुढेही घालणार नाही अशा कडक शब्दात आ. आशुतोष काळे यांनी विरोधकांना सुनावले.

आ.आशुतोष काळे यांनी  डाऊच बु. येथे जलजीवन मिशन अंतर्गत ६० लक्ष ८५ हजार रुपये  पाणी पुरवठा योजना व ९ लक्ष ७५ हजार रुपये निधीतील  ओपन जिम साहित्य कार्यक्रमात केले .
  
आ.काळे पुढे  म्हणाले की, विकास सर्वांसाठी असतो तू करताना लोकप्रतिनिधी म्हणून कधी दुजाभाव केला नाही व करणार नाही   मात्र ज्यांना संधी मिळवणे विकास करता आला नाही ते विघ्न संतोषी लोक विकासाच्या आड येत असतात   त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नसून आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही कर्मवीर शंकरराव काळे यांचे विकासाचे समाजकारण करीत असलो तरी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या तालमीत तयार झालो असून जशास तसे उत्तर देण्याची आमची नेहमीच तयारी असते हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. सरकार बदलले असले तरी विकास कामे थांबणार नाही. सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापूर्वी होत असलेला पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील. विरोधी पक्षाचा आमदार असतांना देखील सत्ताधारी पक्षाकडून निधी आणण्यासाठी बांधील असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. 
यावेळी कोल्हे गटाचे बाजीराव होन, दादासाहेब दहे, दीक्षित दहे, संदीप दहे, सुनील होन, आप्पासाहेब ढमाले, दौलत दहे, सचिन ढमाले, राजेंद्र गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी  काळे  कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे,  शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, प्रविण शिंदे, विष्णू शिंदे,   राधुजी कोळपे,  अर्जुन काळे, आनंदराव चव्हाण, मच्छिन्द्र दहे, भिवराव दहे, धर्मा दहे, बाळासाहेब पवार, नंदकिशोर औताडे, विक्रम बाचकर, शिवाजी दहे, धनराज पवार, भानुदास दहे, बाबासाहेब होन, अक्षय दहे, मंसालाल दहे, योगेश दहे, केशवराव दहे, वाल्मिक दहे, अर्जुन दहे, प्रकाश दहे, गंगाराम गायकवाड, आप्पासाहेब दहे, दत्तात्रय दहे, भाऊसाहेब बढे, मोहन होन, किरण पवार, रोहिदास शाख, विठ्ठल पवार, रतन दहे, किसन काटकर, भाऊ पवार, गौतम दहे, माऊली दहे, पंढरीनाथ गायकवाड, दिनेश गायकवाड, प्रमोद दहे, राजु गायकवाड, संजय गायकवाड, कैलास पवार, केशव बढे, रमेश होन, कर्णा होन, विजय चव्हाण, आदित्य बढे, भाऊसाहेब दहे, मिथुन दहे, विलास दहे, ठकाजी गायकवाड, ज्ञानेश्वर दहे, साहेबराव दहे, कल्याण ढमाले, पोपट गायकवाड, संदीप ढमाले, अनिल दहे, दगु गायकवाड, द्वारकानाथ दहे, जालिंदर बढे, बापूसाहेब दहे, सागर पवार, दत्तू पवार, धर्मा चंदनशिव, संदीप पवार, पांडुरंग कुदळे, रतन भवर, ज्ञानेश्वर शिंदे, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,अभियंता चांगदेव लाटे, शाखा अभियंता अश्विनजी वाघ, राजेंद्र दिघे, ग्रामसेवक महेश काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page