संजीवनी आयुर्वेदिक हॉस्पिटल च्या वतीने सर्व रोग निदान शिबिर संपन्न

संजीवनी आयुर्वेदिक हॉस्पिटल च्या वतीने सर्व रोग निदान शिबिर संपन्न

   On behalf of Sanjeevani Ayurvedic Hospital, all disease diagnosis camps were completed                                     

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue20 Sep, 19.20 pm

By  राजेंद्र सालकर

कोपरगांव :  संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज, पाॅलीटेक्निक, फार्मसी, एमबीए, इत्यादी संस्थांमधिल शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी   संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित संजीवनी आयुर्वेदिक हॉस्पिटल च्या वतीने सर्व रोग निदान शिबिर संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्सच्या  सोलर पार्कमध्ये आयोजीत करण्यात आले होते. या शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. संजीवनी इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे  यांच्या वाढदिवशी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सर्व सामान्य व्यक्तिंना माफक दरात वैद्यकिय सेवा मिळावी, या हेतुने माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक कै. शंकरराव  कोल्हे यांच्या विचार धारेतुन उभारण्यात आलेले हाॅस्पिटल वैद्यकिय सेवा देण्याचे काम करीत आहे.  
या शिबिरात किडणी फंक्शन  टेस्ट, कोलोस्ट्रोल चेक करण्यासाठी लिपिड प्रोफाईल टेस्ट, लिव्हर फंक्शन  टेस्ट, कंपलीट ब्लड काउंट (सीबीसी) टेस्ट व ब्लड शुगर लेव्हल टेस्ट करण्यात आल्या. तसेच प्रत्येकाचा रक्तदाबही तपासण्यात आला. आश्चर्याची  बाब म्हणजे यातील काही कर्मचाऱ्यांना  आपला रक्तदाब अनियमित आहे, याची यापुर्वी जाणिवही नव्हती. यासर्व परीक्षणांमधुन स्क्रीनिंग टेस्ट करून संजीवनी आयुर्वेदिक हाॅस्पिटलचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. राम पवार यांनी जीवितास धोका असणाऱ्या  आजारांबध्दल माहिती देवुन प्रबोधन केले, तसेच आयुर्वेदाचे महत्व विषद केले आणि २००० वर्षांपूर्वीची  परंपरा असलेल्या आयुर्वेदीक उपचार घेण्याचे आवाहन केले.    
सदर प्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, विश्वस्त  सुमित कोल्हे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना  मोफत आरोग्य तपासणीचे आवाहन केले. डाॅ.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल सर्जन डाॅ. भरत कुलथे, नेत्ररोग तसेच कान, नाक व घसा तज्ञ डाॅ. दिव्या सोनवणे, आयुर्वेद पंचकर्म तज्ञ डाॅ. शितल  अव्हाड, डाॅ. शितल अष्टेकर , डाॅ. रविंद्र शेळके व त्वचा रोग तज्ञ डाॅ. स्वप्निल कासार यांनी शिबिरात तपासणीचे कार्य केले. विशेष अधिकारी  प्रकाश जाधव,  मुकुंद भोर , आदींनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.  

Leave a Reply

You cannot copy content of this page