रब्बीसाठी   बियाणे आणि खताचे योग्य नियोजन करा – आ.आशुतोष काळे

रब्बीसाठी   बियाणे आणि खताचे योग्य नियोजन करा – आ.आशुतोष काळे

Proper planning of seeds and fertilizers for Rabi – A. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue20 Sep, 19.30 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव :  चालू वर्षी पावसाने आजवरचे विक्रम मोडीत काढले आहेत त्यामुळे सर्व धरणे तुडुंब भरली असून पाण्याची वाढलेली उपलब्धता लक्षात घेता रब्बीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याची कृषी विभागाने दक्षता घेवून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खताची टंचाई जाणवणार यासाठी योग्य नियोजन करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.

आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच तहसील कार्यालय कोपरगाव येथे कृषी विभागाचे विविध प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी कृषी विभाग व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की,
जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते मात्र जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यासाठी झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे होणे गरजेचे आहे.पंचनामे झाल्यानंतर जास्तीत जास्त मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणे सोईचे होईल.जिल्ह्यात जनावरांना लंपी रोगाची मोठ्या प्रमाणात लग्न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पशू धन धोक्यात आले आहे त्यासाठी पशू संवर्धन विभागाने सर्वच जनावरांचे लवकरात लवकर लसीकरण करावे.पावसाळा संपल्यानंतर शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर विज मिळावी यासाठी ऊर्जा विभागाने नियोजन करावे.ऑक्टोबर पर्यंत उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याची आकडेवारी तयार करून रब्बी हंगामात पिकांना वेळेत मुबलक पाणी मिळेल याची काळजी घेवून रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित कृषी व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते ट्रॅक्टर व अवजारांचे वाटप करण्यात आले.
यावेळी कारभारी आगवन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, राहुल रोहमारे, माजी संचालक सुनील शिंदे, माजी पंचायत समिती उपसभापती सौ. पौर्णिमा जगधने, माजी उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके, रोहिदास होन, दिलीप दाणे,  जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, राष्ट्रवादी युवक  तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, माजी नगरसेवक फकीर कुरेशी, दिनकर खरे, विजय जाधव,शिवाजी शेळके, संभाजी नवले, बाळासाहेब वारकर, बाळासाहेब जाधव, गणेश घाटे, विठ्ठल जावळे,  मोहन पवार, युवराज गांगवे, पंकज पुंगळ, शंकरराव गुरसळ, साईकांत होन, शिवाजी जाधव, किरण पवार, ज्ञानेश्वर पवार, भगीरथ जावळे, भास्करराव गुरसळ, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, भगवान ठोंबळ, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकरी अभियंता भूषण आचारी, यशवंतजी खरोटे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय थोरे, डॉ. श्रद्धा काटे, पाटबंधारे विभागाचे मिसाळ, भंडारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रणशूर, पंचायत समिती कृषी अधिकारी पंडित वाघिरे, बांधकाम अभियंता लाटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page