अल्पावधीत जागतिक वर्चस्व मिळविणारी आयुर्वेद  निर्भय उपचार पद्धती -पद्मश्री वैद्यराज देवेंद्र त्रिगुणा

अल्पावधीत जागतिक वर्चस्व मिळविणारी आयुर्वेद  निर्भय उपचार पद्धती -पद्मश्री वैद्यराज देवेंद्र त्रिगुणा

Ayurveda fearless treatment method that gained global dominance in a short period of time – Padmashri Vaidyaraj Devendra Triguna

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir.23 Sep, 18.50 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : आयुर्वेद उपचार जीवनाचे शास्त्र आहे, आयुर्वेदाला जीवन यात्रा संबोधले असून जगातील इतर सर्व उपचार पद्धतीचे बाह्य व अनिष्ट परिणाम होत असताना केवळ आयुर्वेद निर्भय उपचार पद्धती असल्याने तीने जागतिक वर्चस्व अल्पावधीत मिळविली अशी ठाम ग्वाही पद्मभूषण पद्मश्री वैद्यराज व राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ व प्रशासक समितीचे अध्यक्ष देवेंद्र त्रिगुणा यांनी येथे दिली .             तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ज्ञानपीठात २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन व आयुष्य मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन उद्घाटन प्रसंगी श्री त्रिगुणा अध्यक्षपदावरून बोलत होते.         

याप्रसंगी व्यासपीठावर ओम गुरुदेव माऊली, संत परमानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य राकेश शर्मा, प्रांतीय महामंत्री वैद्य प्रवीण जोशी, आत्मा मालिक ध्यान पिठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, वैद्य आशुतोष गुप्ता मुकुल पटेल वैद्य सतीश भट्टड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.                       
श्री त्रिगुणा पुढे म्हणाले, महाराष्ट्र मध्ये शिर्डी विभागात कोकमठाण येथील आत्मा मालिक ज्ञानपीठात अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन जसे भरवण्यात आले त्या धर्तीवर जगन्नाथ पुरी कर्नाटक उत्तर प्रदेश सह देशभरात पाच ठिकाणी आयुर्वेद महासंमेलन भरवण्यात येईल, आत्तापर्यंत देशभरात 55 रुग्णालय, तसेच या विभागाचे विविध ठिकाणी डॉक्टर्स कार्यरत आहेत, आयुर्वेद उपचार पद्धती ही अनेक जणांना दिली जात आहे. आयुर्वेद चिकित्सा पद्धती सर्व दूर देशभर व देशाबाहेर जाऊन पोहोचली आहे. गोरगरीब लोकांना आयुर्वेदिक उपचार पद्धती मिळावी म्हणून मोठे आयुर्वेद भवन उभारले जाणार आहे, त्यासाठी निधी गोळा करण्याचे काम सुरू आहे. आयुर्वेद पद्धती सर्वांनी अंगीकारावी व त्याचा लाभ इतरांना द्यावा, यासाठी आपण स्वतः वैद्य बनावे असे आवाहन त्यांनी केले.                     
याप्रसंगी बोलताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या ,भारतीय संस्कृती महान आहे, धर्मशास्त्राचा ठेवा मोठा असल्याने व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आयुर्वेदाचा वारसा पुढे नेत आहे. जगाला भुरळ घालणारे आयुर्वेद उपचार शास्त्र घराघरात पोहोचण्यासाठी आयुष मंत्रालय मार्फत भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. पूर्वपर चालत आलेला ऋषी मुनीचा आरोग्याचा ठेवा आयुर्वेदाद्वारे सर्व दूर जगात पोहोचला आहे. प्रत्येकाने रोगी नको निरोगी रहावे, यासाठी आयुर्वेदाचा अवलंब निश्चितपणे करावा. आत्मा मालिक ध्यान पिठाचे संत परमानंद महाराज यावेळी बोलताना म्हणाले, आयुर्वेद ही जीवन पद्धती आहे रोगाचे मुळापासून समोर उच्चाटन व्हावे यासाठी ही कार्यपद्धती अवलंबली जावी आयुर्वेदिक प्राचीन परंपरा असलेल्या या वैश्विक पद्धती चे व आयुर्वेदाचे आचरण करावे त्यामुळे प्रत्येकाचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील जीवनात आयुर्वेदाची पूजा करावी, ध्यान करावे ध्यानी बनावे असा संदेश त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष वैद्य रामदास आव्हाड यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले, ते म्हणाले पद्मभूषण वैद्यराज देवेंद्र त्रिगुणा यांचा आदेश आल्यानंतर केवळ २१ दिवसात या महासंमेलनाची तयारी करण्यात आली या या संमेलनास २१५० देशभरातील विविध वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला याशिवाय नगर नाशिक औरंगाबाद पुण्यासह आयुर्वेद महाविद्यालयातील २००० विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला आहे, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आधी ठिकाणहून ५८ विविध औषध कंपन्यांनी येथे आपले स्टॉल उभारले आहेत. पहिल्याच दिवशी राज्यभरातील भाविकांसह दहा हजार नागरिकांनी या महासंमेलनास व प्रदर्शनास भेट दिली. वनौषधी झाडांची प्रदर्शन येथे भरवले असून १५० च्या वर विविध औषधंच्या प्रजातींची झाडे येथे ठेवण्यात आली आहेत. येथे भरवण्यात आलेल्या तपासणी शिबिरात २०० ते २५० नागरिकांनी पहिल्या दिवशी लाभ घेतला या सर्वांची मोफत तपासणी करून त्यांना सात दिवसाची औषधे मोफत देण्यात आली आहेत.८५ शोधनिबंध व पेपर पोस्टर्स प्रस्ताव दाखल केला आहे.     
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री पिंगळे अपश्चिम बरठ यांनी केले.

चौकट                                            

आत्मा मालिक ध्यानपिठालगत आत्मा मालिक रुग्णालय गोरगरिबांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले आहे तेथे वैद्य डॉक्टर रामदास आव्हाड यांनी आयुर्वेद कक्ष सुरू करावा व शिर्डीच्या साईबाबाच्या रुग्णालयात जशी विनामूल्य उपचार पद्धती राबवली जाते त्याच धर्तीवर येथे कक्ष सुरू करून सेवा देण्याची कार्यवाही सुरू करावी या केलेल्या आव्हानास डॉ. आव्हाड यांनी प्रतिसाद देत आपण येथे कक्ष सुरू करून सेवा देऊ. याप्रसंगी दिल्ली येथील आयुर्वेद भवन उभारणीसाठी डॉक्टर  रामदास आव्हाड यांनी एक लाख एक हजार रुपयांचा बिल्डिंग फंड देणगी जाहीर केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page