कर्मवीर काळे कारखान्याची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

कर्मवीर काळे कारखान्याची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

69th Annual General Meeting of Karmaveer Kale Factory concluded

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat.24 Sep, 18.00 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : आज कर्मवीर शंकरराव  काळे सहकारी साखर कारखान्याची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (दि२४ ) रोजी  कारखान्याचे  कार्यस्थळावर विद्यमान चेअरमन आमदार आशुतोष काळे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेस कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोक काळे, व्हाईस चेअरमन दिलीप  बोरनारे तसेच गौतम बँक, जिनिंग प्रेस, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका माजी सदस्य  व सर्व विदयमान संचालक मंडळ उपस्थित होते.

      सभा सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर शंकरराव काळे व सौ सुशीलामाई काळे  यांच्या प्रतिमेचे पूजन चेअरमन आशुतोष काळे यांनी  केले. 
सर्व संचालक मंडळाचे वतीने माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे व अहवाल सालातील भारतातील थोर नेते, स्वातंत्र्यसेनानी, संशोधक, शास्ञज्ञ, लेखक, साहित्यिक, जवान, कलावंत, शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, कारखान्याचे सभासद, हितचिंतक, कर्मचारी दिवंगत झाले आहेत. त्यांना चिरशांती व सदगती लाभो अशी कारखान्याचे संचालक मंडळ. सभासद, अधिकारी कर्मचारी व कामगार बंधूभगिनी यांचे वतीने भावपूर्ण श्रध्दांजली संचालक सूर्यभान कोळपे यांनी अर्पण  केली. 
   
यावेळी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणा-या सभासद शेतक-यांचा कारखान्याच्या वतीने  सत्कार करण्यात आला यामध्ये आडसाली-प्रल्हाद धसे, दहीवाडी, पूर्व हंगामी-तुषार बारहातेसंवत्सर, सुरु-राजेंद्र खिलारी, ब्राम्हणगाव, खोडवा-धनंजय चव्हाण, चांदेकसारे या शेतक-यांचा समावेश होता.
 यानंतर कारखान्याचे चेअरमन   आशुतोष काळे  यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. यावेळी बोलताना चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी सरकारनी एफ. आर. पी. दरात वाढ केली  यामुळे शेतकऱ्यांचा फायदा असल्याने  सरकारच्या या धोरणाच्या  आपण आभार मानतो परंतु दुसरीकडे सरकारने  एफ आर पी वाढवला  त्याच तुलनेत साखरेचे दर ३१५० वरून  ३६०० ते ३७०० रूपये  प्रतिक्विंटल करावा अशी मागणी केली . दुसरी मागणी करताना  आमदार काळे म्हणाले, सरकारने  जादा दिलेला एफ. आर. पी.  व सवलतीच्या दरात दिलेली साखर  यावर जो आयकर आकारला आहे  तो आयकर माफ केला  परंतु प्रत्यक्षात तो आयकर मात्र  सन २०१५ व २०१६ सालापर्यंतच माफ झालेला आहे.  उर्वरित वर्षांची  आयकराची रक्कम प्रत्येकी शंभर व दोनशे कोटीची आहे  तेवढा कर भरण्यासाठी  प्रत्येकाला कारखाना दोन ते तीन वेळेस विकावा लागेल. तेव्हा सरकारने संपूर्ण आयकर सरसकट माफ करावा अशी मागणी केली  तिसरी मागणी करताना सरकारने  ओपन लायसनवर  ८० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याचे धूर धोरण जाहीर करावे त्यामुळे  कच्च्या साखरेचे  नियोजन होईल  असे त्यांनी सांगितले. यानंतर आमदार काळे म्हणाले सरकार बदलले असले तरीही मी सेवक म्हणून काम करणार आहे तुमच्या सर्व बागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू राहील अशी ग्वाही दिली तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात  संकटे वादळे अतिवृष्टी कोरोना  अशी संकट आली  आघाडीच्या मंत्र्यांनी दौरा करून  बैठकीत पॅकेज जाहीर करून तसा आधार  आताच्या सरकारने  लोकांना   देण्याची गरज आहे.  पंचनामे योग्य पद्धतीने व्हावे, नुकसानग्रस्तांना योग्य मोबदला  देऊन आधार  देण्याचे काम सरकारने करावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले .
आपण २५०० रुपये भाव दिला, दुसरा हप्ता १०० रुपयाचा दिला. दरात भेदभाव केला नाही. आता दसऱ्यानंतर आणखी पन्नास रुपये देणार आहे असा एकूण २६५० रुपये भाव दिला असल्याचे सांगितले यावर दसऱ्याला पन्नास रुपये देणार म्हणताच लोकांनी शंभर रुपये देण्याची मागणी केली यावर मात्र चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी सर्व आर्थिक नियोजन करून ही रक्कम देण्याचे ठरले आहे तेव्हा आता यात बदल करणे शक्य नाही असे सांगितले. 
विषयपञिकेनुसार सभेच्या कामकाजास प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी सुरुवात केली व सर्व सभासदांकडुन  सर्वच्या सर्व अकरा विषय  खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करणेत आले. 
कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे  यांनी  मार्गदर्शन केले. त्यांनी कारखान्याच्या ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमधील सर्व विषयांस मान्यता दिलेबदद्ल सर्व सभासदांचे संचालक मंडळाचे वतीने आभार मानले. सूत्रसंचालन अरुण चंद्रे यांनी केले
     
 वार्षिक सर्वसाधारण सभेस  उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिलीप   बोरनारे   यांनी मानले.

चौकट 

 बदलत्या राजकीय  परिस्थितीचे पडसाद सर्वसामान्यापर्यंत पोहोचले आहेत. यावर भाष्य न केलेलेच बरे , बोललो तर मागे इडा पिडा लागेल त्यावर मात्र मोठा हशा पिकला...

Leave a Reply

You cannot copy content of this page