साई संजीवनी बँकेस सर्वोत्कृष्ट बँक्स पुरस्कार प्रदान. 

साई संजीवनी बँकेस सर्वोत्कृष्ट बँक्स पुरस्कार प्रदान. 

Best Bank Award given to Sai Sanjeevani Bank.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir.23 Sep, 18.40 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव : महाराष्ट्र अर्बन को. ऑपरेटीव्ह बॅंक्स फेडरेशन मुंबई यांच्यावतीने राज्यस्तरावर युनिट बँका व १०० कोटी पर्यंत ठेवी असलेल्या बँक गटात कोपरगावच्या साई संजीवनी बँकेस राज्यस्तरावरील द्वितीय पुरस्कार अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि२३)वितरीत करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष  विवेक कोल्हे यांनी सदरचा पुरस्कार स्विकारून तो माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व सभासद शेतक-यांना समर्पित केला..

 विद्याधर अनास्कर म्हणाले की, देशाच्या विकासात सहकारी संस्थाचा मोठा वाटा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यांची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टाकुन सहकारी संस्थामध्ये विविध सुधारणा करण्याचे काम त्यामाध्यमातून सुरू आहे. ग्रामिण अर्थकारणात वित्त पुरवठा करण्यांत नागरी बँकाचे विशेष महत्व असून त्यातुन तळागाळातील गरजवंतांना सुलभ अटीवर अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. सहकारी संस्थांनी केलेल्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात येवून सर्व सहकारी संस्थांना यथोचित मार्गदर्शन फेडरेशनच्यावतीने दिले जाते असे सांगितले. 
        
 विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करत या बँकेला सभासद शेतकरी ठेवीदार हितचिंतकांच्या विश्वासाने प्रगतीच्या शिखराकडे नेले आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे अर्थनितीबाबत सतत मार्गदर्शन करत असतात. साई संजीवनी बँकेकडे गेल्या आर्थीक वर्षात ८२ कोटी रुपयांच्या ठेवी असून त्यापैकी ५६ कोटी रूपयाचे कर्ज वितरण केले बँकेला ८५ लाख रूपयांचा नफा झाला आहे. थकबाकीचे प्रमाण अत्यल्प आहे. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष रेवजी कंजाजी आव्हाड, संचालक गोरख आव्हाड, संभाजीराव रक्ताटे, बापूराव बारहाते, अशोकराव टुपके, मुख्य कार्यकारी अधिकारी पदमाकर सभारंजक आदि उपस्थित होते. सहकार महर्षी  कोल्हे  कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव व सर्व संचालक विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, वित्त संस्थांनी बँक व्यवस्थापनाचे अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page