संजीवनीच्या अभियांत्रिकी : १३३ अभियंत्यांची विप्रो मध्ये निवड- अमित कोल्हे
Sanjeevini Engineering: 133 engineers selected in Wipro – Amit Kolhe
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नांचे फलितFruit of efforts of Training and Placement department
By
राजेंद्र सालकर
कोपरगांवः संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालया मार्फत पालकांच्या व पाल्यांच्या महत्वाकांक्षा पुर्ण करण्यासाठी जाणिव पुर्वक प्रयत्न केले जातात. याच अनुषंगाने विप्रो टेक्नाॅलाॅजी, पुणे या साॅफ्टवेअर क्षेत्रात आघाडीच्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत संजीवनीच्या १३३ नवोदित अभियंत्यांची निवड करून त्यांनी व पालकांनी पाहीलेले स्वप्न पुर्ण केले, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.
विप्रो कंपनीने 2021-22 या शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षात शिकलेल्या नवोदित अभियंत्यांची निवड जाहिर केली. यामध्ये काॅम्प्युटर इंजिनिअरींग, इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी, मेकॅनिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्राॅनिक्स अण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग व सिव्हील इंजिनिअरींगच्या एकुण १३३ अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली.
श्री कोल्हे पत्रकात पुढे म्हणाले की संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर महाविद्यालयाच्या प्रयत्नातुन विद्यार्थ्यांना नोकरी मिळणारच, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांमध्ये कधीही जास्तीचा ताणतणाव निर्माण न होता मुलाखतींना सामोरे जाण्यासाठीची अगदी नियोजनबध्द तयारी प्रत्येक उपक्रमातुन करण्यात येते.
नवोदित अभियंत्यांच्या या निवडीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.