शिरसगाव येथे शेतकरी संघाची शाखा सुरू – विवेक कोल्हे
Branch of Farmers Union started at Shirasgaon – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 6 Oct , 19.00 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगांव : शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणा-या घटकांची सामग्री शेतक-यांना त्यांच्या बांधावर एकाच दालनात उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून शेतकरी संघाची निर्मिती केली आज त्याचीच एक शाखा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुक्याच्या पूर्व भागात शिरसगाव येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू करत असल्याची माहिती सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने पुर्व भागाच्या विकासासाठी संघर्ष करत काम केले.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात शेतकरी संघाच्या आठ शाखा कार्यरत आहे. आज बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सर्वत्र स्पर्धा सुरू झाली आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. आता किटकनाशक फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञान आले आहे शेतक-यांनी ते अवगत करावे त्यासाठी संघ आर्थीक सहकार्य देवून शेती विकासात मदत करेल. इफकोने नॅनो तंत्रज्ञानातुन युरिया खतासह शेतीसाठी आवश्यक उत्पादने आधूनिक तंत्रज्ञानाने विकसीत केली आहेत शेतक-यांनी त्याचा लाभ घ्यावा असेही ते म्हणाले.
प्रारंभी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड यांनी प्रास्तविक केले. उपाध्यक्ष विलासराव कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संतोष भागवत व सौ मंगल भागवत या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण महापुजा करण्यांत आली. इफकोचे अहमदनगर क्षेत्र अधिकारी तुषार गोरड, प्रमोद नेरकर, इश्वर चोखर, क्षेत्रीय विपणन व्यवस्थापक अमोल जाधव यांनी इफको खते व शेतीविषयक उत्पादने कशी सरस आहे व त्याच्या वापराने शेती उत्पादनांत होणा-या वाढीबददल माहिती दिली.
याप्रसंगी कोल्हे कारखान्यांचे संचालक विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, केशवराव भवर, भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, उत्तमराव चरमळ, माजी सभापती महेंद्र काले, संघाचे संचालक सर्वश्री. बबनराव निकम, वाल्मीक भास्कर, रघुनाथ फटांगरे, चंद्रकांत देवकर, विश्वासराव गाडे, कल्याणराव चांदगुडे, अरूण भिंगारे, सुभाषराव गायकवाड, संजय भाकरे, छबुराव माळी, सुभाष कानडे, चंद्रकांत कुलकर्णी, सोमनाश राशिनकर, हबीब पटेल, गोरख चौधरी, महंमद पटेल, ऋषीकेश भोकरे, नजिम पटेल, ज्ञानदेव भागवत, शकीलभाई पठाण, दादा सुभे, शिवाजीराव भगुरे, रावसाहेब जाधव, अनिल मलिक, गोविंद मलिक, अशोक शिंदे, मनोज पुते, अशोक निवृत्ती शिंदे, अंबादास पाटोळे, प्रकाश गव्हाळे, किसन गव्हाळे, शिवाजी जाधव, अशोक गायकवाड, रविंद्र देशमुख, वाल्मीक भिंगारे, रविंद्र रांधवणे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव, शिरसगांव पंचक्रोशीतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी संघाचे व्यवस्थापक हरिभाऊ गोरे यांनी आभार मानले.