सख्या बहिणीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या बहिणीला अटक, कोपरगाव शहर पोलिसांकडून पर्दापाश
The sister who killed her friend and faked suicide was arrested, Kopargaon city police busted
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 6 Oct , 14.00 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : पाठच्या बहिणीचा गळा आवळून खून केल्यानंतर तरुणीने राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्याचा बनाव करणाऱ्या बहिणीचा कोपरगाव शहर पोलिसांनी पर्दापाश केला. याप्रकरणी पोलिसांनी बहिणीला जेरबंद केले आहे.
सृष्टी नवनाथ बानकर (वय १९ रा. भन्साळी ट्रॅक्टर जवळ तीन चारी कोकमठाण, ) असे अटक केलेल्या मुलीचे नाव आहे. हर्षदा नवनाथ बानकर (वय १६ ) असे खून झालेल्याचे नाव मुलीचे आहे. ही घटना ३० सप्टेंबरला कोकमठाण मध्ये घडली होती. शहर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
या प्रकरणी मयत मुलीची आई सौ संगीता नवनाथ बानकर घरकाम व हॉटेल व्यवसाय(वय ४० रा. भन्साळी ट्रॅक्टर जवळ तीन चारी कोकमठाण, ) बुधवारी सायंकाळी सहा सव्वा सहा वाजता पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिल्याने भादंवी ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तालुक्यातील कोकमठाण तीन चारी भन्साळी ट्रॅक्टर जवळ बानकर
कुटूंबिय राहायला असून त्यांना १९ वर्षाची सृष्टी नावाची व सोळा वर्षाची हर्षदा नावाच्या दोन मुली आहेत. आरोपी सृष्टीचे आकाश राजेंद्र कांगुणे यांच्याबरोबर प्रेम संबंध होते त्याने तिला एक मोबाईल दिला होता हा मोबाईल सृष्टीची लहान बहिण हर्षदा येणे पकडून मम्मी पप्पा कडे दिला होता तिचे प्रेम प्रकरण उघड झाल्यामुळे व तिचे कॉलेज जाणे बंद बंद झाले याचा राग तिच्या मनात होता आरोपी सृष्टीलाप्रेम संबंध असलेल्या आकाश राजेंद्र कांगुणे त्याच्यासोबत घरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना यातील मयत मुलगी हर्षदा हिने तिला विरोध केल्याने आरोपीत सृष्टी हिने हर्षदा हिचा कापडी ओढणीने गळा आवळून तिला जिवे ठार मारले त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह घरात ठेवून तिच्या आत्महत्येचा बनाव केला.
आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी धाव घेउन मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केला होता .
तपासादरम्यान पाच दिवसात आरोपी सृष्टी नवनाथ बानकर हिने प्रियकर आकाश राजेंद्र कांगुणे यांच्याबरोबर माळ टाकून लग्न केले व दोघे श्रीरामपूर येथे राहत असताना पोलिसांनी त्यांना तेथे अटक केली
असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पथकाने सृष्टी हिला ताब्यात घेतले असता तिने खूनाची कबुली दिली.
म्हणून केला खून
बहिणीने मोबाईल आई-वडिलांना दिला आई-वडिलांनी कॉलेज जाणे बंद केले पळून जात असताना बहिणीने परत विरोध केला . त्यामुळे रागाच्या भराततिचा कापडी ओढणीने गळा आवळून जिवे ठार मारले व तिच्या आत्महत्येचा बनाव केला. तिने आत्महत्या केली नसून मी व तिचा त्यांचा खून केल्याची कबुली सृष्टीने दिली.





