शिवसेनेने सादर केलेले प्रतिज्ञापत्र बोगस नाही पोलिसांचा निर्वाळा
The affidavit submitted by the Shiv Sena is not bogus, it is the police’s fault
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 14 Oct , 18.30 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : गेल्या तीन दिवसापासून कोपरगाव येथे मुंबई क्राईम ब्रँच कडून शिवसेनेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र चौकशी करण्याचे सुरू होते या तपासात एकही प्रतिज्ञापत्र हे बोगस नसल्याचा खुलासा मुंबई क्राईम ब्रँच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांनी प्रसारमाध्यमासमोर बोलताना केला दरम्यान गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेली चौकशी एक प्रकारे आता संपुष्टात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सदस्य नोंदणी करिता प्रतिज्ञापत्र भरून देण्याचे आव्हान केले होते त्यानुसार नगर जिल्ह्यातून हजारो सदस्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते कोपरगाव जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली अशीच मोठी अशीच मोहीम राबविण्यात आली होती त्यावेळी उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना मिळाला होता. झावरे यांनी सदरचे शपथपत्र हे शिवसेना पक्ष कार्यालयाकडे सुपूर्त केले होते
मागील आठवड्यात राज्य सरकारने हे शपथपत्र तपासण्याचे आदेश दिले होते त्यानुसार कोपरगाव येथे बुधवारी (१२) रोजी आलेल्या मुंबईच्या क्राईम ब्रँच पथकाने गेल्या तीन दिवसात ज्यांनी ज्यांनी शपथपत्र दिले होते त्यांना समक्ष बोलावून त्यांची चौकशी सुद्धा केली होती अनेकांचे जबाबही नोंद केले होते तसेच प्रतिज्ञापत्र समवेत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून ही योग्य आहेत की नाही याची खात्री त्यांनी तपासाच्या माध्यमातून केली होती गेल्या तीन दिवसापासून शिवसेनेच्याआजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते ज्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते त्यांची चौकशी केली या सर्व चौकशीनंतर नेमकी आता काय भूमिका पुढे येते पोलीस कशा पद्धतीने तपास करतात याबाबतची चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात सुरू होती
आज या संदर्भात तपासी अधिकारी तथा मुंबई क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सानप प्रसार माध्यमांसमोर म्हणाले,प्रतिज्ञा पत्राच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी ठाकरे गटातील ज्यांनी प्रतिज्ञापत्र करून दिलेली आहेत त्या प्रत्येक शिवसैनिकांला समक्ष बोलवून घेऊन प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांनी ते प्रतिज्ञापत्र केले आहे किंवा नाही याची खात्री केली सर्वांनी आमचे समोर ते प्रतिज्ञापत्र केल्याचे सांगितले त्याप्रमाणे त्यांचे जबाब नोंद केलेले आहेत आणि त्याची पुढची कारवाई करीत आहोत जवळपास सर्वच जणांची चौकशी झाली असून ज्या लोकांनी प्रत्यक्ष सांगितले की, नाही आम्हीच प्रतिज्ञापत्र करून दिलेले आहेत त्यामुळे ते प्रतिज्ञापत्र बोगस किंवा खोटे आहे असे सध्या तरी निदर्शनास आले नाही, अशी माहिती त्यांनी बोलताना दिली.
चौकट
आम्ही सर्व शिवसैनिक आहोत जे करू ते समोर समोर करू सरळ करतो हो आम्हीच उद्धव ठाकरे साहेब यांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्र करून दिलेले आहेत. क्राइम ब्रांचच्या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही सगळे शपथपत्र खरे निघाले असा दावा त्यांनी केला. वाईट याच गोष्टीचे वाटते की आक्षेप घेणारा शिंदे गट स्वतः आणि त्यांचा चष्मा नकली असल्याची टीका त्यांनी केली – जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे