गुजरातची एक हाती  सत्ता हा पंतप्रधान मोदी  यांच्या नेतृत्वावरील विश्वास – सौ. स्नेहलता कोल्हे

गुजरातची एक हाती  सत्ता हा पंतप्रधान मोदी  यांच्या नेतृत्वावरील विश्वास – सौ. स्नेहलता कोल्हे

Power of Gujarat in one hand is faith in the leadership of Prime Minister Modi – Mrs. Snehlata Kohle

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 9 Dec22 , 12.30 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :   गुजरात विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाला १८२ पैकी १५६ जागा देऊन एक हाती सत्ता दिली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे प्रतीक आहे, सबका साथ सबका विश्वास सबका विकास हेच यातून सिद्ध होते या विजयाबद्दल भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक संकटात देशातील सर्व नागरिकांना मोठा धीर देऊन सहकार्य केले आहे. कोरोना आपत्तीत पंतप्रधान मोदी यांचे कार्य जगाला गवसणी घालण्यासारखे आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे आजी माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मेहनत, गुजरात विधान सभेच्या सर्व मतदार बांधवांसह सर्वांचे भाजपाच्या विजयात मोलाचे योगदान आहे असे शेवटी सौ. कोल्हे म्हणाल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page