कोपरगाव  नायलॉन मांजा सुरक्षा; गळा बंद रक्षा पट्टी वाटप 

कोपरगाव  नायलॉन मांजा सुरक्षा; गळा बंद रक्षा पट्टी वाटप 

Kopargaon Nylon Manja Security; Allotment of throat protection band

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat14Jan23 , 17.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : नायलॉन मांजा एका खास प्रक्रियेने तयार करून मजबूत बनविला जातो.मात्र हा मांजा दुचाकीस्वारांसाठी धोक्याचा ठरतो. अनेकजण दरवर्षी जखमी होतात, तर काही जणांच्या जिवावरदेखील बेतते. ही बाब लक्षात घेता येथील रोटरी  रोटरॅक्ट ऑफ सेंट्रल कोपरगाव यांनी नायलॉन मांजा सुरक्षा; गळा बंद पट्टी अर्थात ‘रक्षा पट्टीचे’ वाटप शहरातील अहिंसा चौकात दुपारी केले. 

मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक पतंग उडविणारे अनेक बेजबाबदार  बंदी असूनदेखील नायलॉनच्या मांजाचा उपयोग करून पतंग उडविले जातात; याप्रकरणी आज  दोन जणांच्या गळ्याला जखमा झाल्याचे कळते.
धारदार नायलॉन  मांजा मुळे कुणाच्याही आयुष्याची दोरी कापली जाण्याचा धोका असतो. हीच बाब लक्षात घेता पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री-खरेदी करणाऱ्यांविरोधात कारवाईचे प्रमाण वाढविले आहे. नायलॉन मांजाचा उपयोग करून कुणीही पतंग उडविली तरी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
नायलॉन मांजामुळे प्राणी-पक्ष्यांनादेखील धोका संभवतो. आतापर्यंत अनेक पक्षी जायबंदी झाले आहेत. याशिवाय लहान मुलांचेदेखील गळे कापले गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
दुचाकीस्वारांसाठी नायलॉन मांजा प्रचंड धोकादायक आहे. दुचाकीवरून जात असताना समोर मांजा आल्यावर गाडीचा तोल सावरत नाही. एकीकडे मांजामुळे होणारा आघात व दुसरीकडे वाहनाचा वेग यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. दरवर्षी असे अनेक अपघात होताना दिसून येतात. त्यामुळेच  येथील रोटरी क्लब नारायण शेठ अग्रवाल परिवाराच्या वतीने  गळ्याची सुरक्षा करणाऱ्या रक्षा पट्ट्या वाटण्यात आल्या.
 संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे  डॉक्टर दत्तात्रय मुळे नारायण शेठ अग्रवाल माधवराव देशमुख पोलीस उपनिरीक्षक भरत दाते  नगरसेवक योगेश बागुल, योगेश जोबनपुत्रा, किशोर गंगवाल, श्यामसुंदर डागा, जितेंद्र  गंगवाल राजेंद्र  क्षत्रीय, आदी मान्यवरांच्या हस्ते हजार पट्ट्यांचे वाटर रक्षा पट्ट्यांचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लबचे प्रेसिडेंट वीरेश अग्रवाल  सेक्रेटरी राकेश काले, रोहित वाघ, विशाल आढाव, अमर नरोडे, डॉ विनोद मालकर, इमरान सय्यद, रिंकेश नरोडे, हर्षल दोषी, सनी आव्हाड, अनुप डागा, जीवन भंडारे, सौरभ मोरे यांचे सहकार्य मिळाले.
दुचाकी कमी वेगाने चालवा,गळ्याभोवती जाड रुमाल, स्कार्फ किंवा मफलर गुंडाळा, रुमाल, स्कार्फ नसेल तर शर्टच्या वरील बटन लावा हेल्मेटची काच लावून दुचाकी चालवा
मांजा समोर आला तर हात समोर करून गळा वाचवा,कुणी नायलॉन मांजा वापरत असेल तर लगेच पोलिसांना कळवा असे आवाहन शहर  पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले.

चौकट

नायलॉन मांजा हा धोकादायक असतो. यासंदर्भात वारंवार आवाहन करण्यात येत आहे. जर कुणी नायलॉन मांजाचा वापर करीत असेल किंवा नायलॉन मांजाचा उपयोग करीत असेल तर थेट पोलिसांना कळवा, असे आवाहन कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे

 

Leave a Reply

You cannot copy content of this page