उद्योग व शिक्षण क्षेत्र समन्वयातून देशाची प्रगती गतिमान होईल – प्रसाद कोकिळ

उद्योग व शिक्षण क्षेत्र समन्वयातून देशाची प्रगती गतिमान होईल – प्रसाद कोकिळ

The progress of the country will accelerate through the coordination of industry and education sector – Prasad Kokil संजीवनीत  इंडस्ट्री-अकॅडेमिया  परीसंवाद Sanjeevneet Industry-Academia Symposium

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat14Jan23 , 17.10 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांव: देशाची शैक्षणिक  धोरणे ठरविताना उद्योग जगताचा अभिप्राय महत्वाचा मानला जातो. बदलत्या तंत्रज्ञानानुसार व उद्योग जगताला कसे मनुष्यबळ  अपेक्षित आहे,  यासाठी उद्योग आणि शिक्षण  क्षेत्राने परस्परांशी  समन्वय ठेवणे गरजेचे, त्यामुळे देशाची  प्रगती अधिक गतिवान होईल, असे प्रतिपादन भारतीय उद्योग महासंघ (कॉन्फीडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज-सीआयआय), मराठवाडा विभागीय परीषदेचे अध्यक्ष प्रसाद कोकिळ यांनी केले. अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे होते.
सीआयआय, मराठवाडा विभागाच्या सहाकार्याने उद्योगाच्या माध्यमातुन उच्च शिक्षणाची पुनर्कल्पना व शैक्षणिक  कार्य या विषयावर एक दिवशीय परीसंवाद  संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य सभागृहात आयोजीत करण्यात आला. 

यावेळी सीआयआय, मराठवाडा विभागाचे उपाध्यक्ष  समित सचदेवा, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे व चिफ टेक्निकल ऑफिसर  विजय नायडू व्यासपीठावर उपस्थित होते. या परीसंवादास फोर्बस मार्षल, महिंद्रा सीआई ऑटोमोटिव्ह  लि., किर्दक ग्रुप, भारत फोर्ज लि.,एंड्रेस  हौझर फ्लोटेक प्रा. लि., सिमेन्स लिमिटेड, सिग्मा टुलिंग इंडिया प्रा. लि.,अपटेक लिमिटेड, संजय ग्रुप, एंड्रेस  हौझर ऑटोमेशन अँड इंस्ट्रूमेंशन  प्रा. लि., इत्याइी कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर, चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफीसर, एच आर मॅनेजर, तसेच महाराष्ट्र इन्स्टिटयूट  ऑफ टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, औरंगाबाद, सीएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, औरंगाबाद, शताब्दी इंजिनिअरींग कॉलेज, नाशिक , संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज, संजीवनी बी व डी फार्मसी महाविद्यालय, संजीवनी एम.बी.ए., संजीवनी पॉलीटेक्निक, तसेच अहमनगर जिल्ह्यातील काही इंजिनिअरींग व पॉलीटेक्निकचे डायरेक्टर, प्राचार्य, प्रतिनिधी उपस्थित होते.  
           
अमित कोल्हे यांनी सर्वांचे स्वागत केले व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित विविध संस्थाचा प्रगतीचा आलेख मांडला.

श्री कोकिळ पुढे म्हणाले की, प्राथमिक शिक्षण  हे वैयक्तिक गरजा भागविण्यासाठी पुरेसे आहे, परंतु वैयक्तिक गरजा भागवुन इतरांना मदत करण्यासाठी उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही. समुद्रात जसे खोल गेल्यावर पाण्याचा दाब वाढतो, तसे शिक्षण  संस्थानी खोलवर अभ्यासकरून विध्यार्थ्यांना किती चांगले ज्ञान देवु शकतो याचा विचार केला पाहीजे. वर वर शिक्षण देण्यापेक्षा कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून वेगवेगळ्या  उद्योगांमध्ये विध्यार्थी घेवुन जावे. सर्वच व्यावसायिक संस्थांमध्ये शेवटच्या वर्षी  आपापल्या शाखेनिहाय प्रोजेक्ट करणे अनिवार्य असते. परंतु अशा  प्रोजेक्टस्चे लोकोपयोगी उत्पादन म्हणुन परीवर्तन होत नाही. म्हणुन अभ्यासक्रमाच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षापासूनच  प्रोजेक्टवर मंथन झाले पाहीजे, आणि शेवटच्या वर्षापर्यंत  त्याचे उत्पादनात रूपांतर झाले पाहीजे, तसे नाही झाले तर त्याच प्रोजेक्टवर काम करण्यासाठी पुढील बॅचला कामास लावणे योग्य राहील. चांगल्या प्रोजक्टस्ला सीआयआय स्पॉन्सरशिप  देण्यासाठी पुढाकार घेईल.  स्वतःच्या आस्तित्वाला आव्हान करीत, ध्येयाने वेडे होवुन पुढे गेल्यास शिक्षण  संस्था पुढे जातील, चांगले तंत्रज्ञ निर्माण होतील.
          नितीनदादा कोल्हे म्हणाले की, जगात भारताने अग्रेसर व्हावे, हे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला बळकटी देण्यासाठी सीआयआय व शिक्षण  संस्था हातात हात घेवुन मंथन करीत आहे, ही बाब उल्लेखनिय आहे. उद्योगाला कोणते कौशल्ये असणारे तंत्रज्ञ पाहीजे हे या परीसंवादातुन पुढे येईल. ं
उद्घाटनानंतर दिवस भर चर्चा सत्रे चालले. यात इंडस्ट्रीचे प्रतिनिधी आणि शैक्षणिक  संस्थांचे प्रतिनिधी यांच्यात वैचारीक देवाणघेवाण झाली.
विध्यार्थी पलाश  पाटील व अजिता पुंड यांनी सुत्रसंचालन केले तर डॉ. व्ही. एम. तिडके यांनी आभार मानले. डॉ. आर. ए. कापगते यांच्या सह प्रशासकिय अधिकारी प्रकाश  जाधव यांच्या सर्व टीमने कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष  परीश्रम घेतले.

Leave a Reply

You cannot copy content of this page