कोपरगाव खुले नाट्यगृहाचे  काम अजून का सुरू झालेलं नाही? मंगेश पाटील

कोपरगाव खुले नाट्यगृहाचे  काम अजून का सुरू झालेलं नाही? मंगेश पाटील

Why hasn’t the work of Kopargaon open theater started yet? Mangesh Patil

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun15Jan23 , 18.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  अनेक वर्षापासून कोपरगाव खुलेनाट्यगृहाची अवस्था दूरदर्शन झालेली आहे. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठीची एक कोटीच्या कामाची निविदा मंजूर करून ठेकेदाराला काम दिले गेले. परंतु  सव्वा ते दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही  या  खुले नाट्यगृहाचे काम का सुरू  झालेलं नाही.? असा सवाल प्रसिद्धी पत्रकारद्वारे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी  उपस्थित केला आहे.

दुराअवस्था झालेले खुलेनाट्यगृह
शिवजयंतीच्या निमित्ताने मोठे सांस्कृतिक कार्यक्रम, लहान लहान शाळांचे गॅदरिंग असतील विविध प्रकारच्या नाट्य स्पर्धा असतील अशावेळी  सुमारे एक कोटीचा निधी देऊनही खुले नाट्यगृह दुरुस्तीचे  काम अद्याप सुरू का झाले नाही ?  हे मुद्दे चर्चेत येतात.  या अनुषंगाने माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी  विविध शाळांच्या गॅदरिंगच्या निमित्ताने  केलेला हा रिॲलिटी  चेक.
कोपरगाव शहरातील खुले नाट्यगृह वा बंदिस्त नाट्यगृह हा विषय गेल्या सात आठ वर्षापासून  निधी नाही जागा नाही अशा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं.  मात्र,खुले नाट्यगृह  काम कधीच सुरू झालं नाही. 
  कोपरगावातील नाट्यप्रेमी जनता , नागरिक , शाळेतील लहान मुले मुली  व कलाकार यांच्या साठीचे स्टेज व नाट्य गृहाचे नूतनीकरण पूर्ण होऊन त्याचा लाभ घेण्यासाठी आसुरलेल्ल्या नाट्यरसिकांसाठी हे काम कधी पूर्ण होणार म्हणून अनेक वर्षांपासून वाट बघत आहे.गेल्या दीड वर्षांपूर्वी खुलेनाट्यगृहाच्या दुरुस्ती कामाची निविदा मंजूर झाली. हे काम  येथील ठेकेदाराला मिळालं. या जुन्या  खुलेनाट्यगृहाच्या  कोट्यावधीच्या दुरुस्ती कामाचे नारळ देखील लोकप्रतिनिधीच्या हस्ते फुटले  खरं, पण  काम सुरू झालं नाही नेमके झालं काय? इतका मोठा निधी देवूनही देखील जर दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण झाले नाही , केले नाही याला जबाबदार कोण ?  असा सवाल पाटील यांनी  पत्रकातून केला आहे                 
                   
 नगरपालिकेत मुख्याधिकारी हे मुख्याधिकारी व  प्रशासक  म्हणून दोन्ही पदांवर काम करत आहे. नगरपालिकेचे मुख्य म्हणून त्यांनी ह्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या ह्या कामाकडे लक्ष देऊन हे काम खरे तर चांगल्या दर्जाचे करून घ्यायला पाहिजे होते. अद्याप पर्यंत निधी पैकी किती रक्कम खर्च केली? याचा खुलासा पालिकेने  करावा याला जबाबदार कोण ? निधीच्या विनियोग कसा व किती झाला?  व कामाचे स्टेटस काय? हे विचारण्याचा हक्क असलेल्या कर भरणाऱ्या जनतेला  सांगावे असे जाहीर आवाहन  पाटील यांनी पत्रकातून शेवटी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page