भारतीय लष्कर दिन; सर्व सैनिकांसाठी  सवलतीच्या दरात होमिओपॅथिक उपचार – डॉ. राजेंद्र श्रीमाळी

भारतीय लष्कर दिन; सर्व सैनिकांसाठी  सवलतीच्या दरात होमिओपॅथिक उपचार – डॉ. राजेंद्र श्रीमाळी

Indian Army Day; Discount Homeopathic Treatment for All Soldiers – Dr. Rajendra Shrimali

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun15Jan23 , 18.40 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : भारतीय लष्कर  १५ जानेवारी रोजी आपला ७५ वा स्थापना दिवस साजरा करत आहे.  या यानिमित्ताने येथील डॉ. श्रीमाळीज होमिओपॅथिक मल्टीस्पेशालिटी क्लिनिकद्वारे  यापुढे महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व सैनिकांसाठी तपासणी व औषधे ५० टक्क्यांची सवलत देण्यात येईल अशी घोषणा स्पेशालिटीचे डॉ. राजेंद्र श्रीमाळी यांनी केली.

वैद्यकीय क्षेत्रातील सेवेलाही मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य मंदिरात सेवा करताना अनेक डॉक्टरांनी सामाजिक दृष्टिकोनसमोर ठेवून मानवी सेवेचे व्रत स्वीकारले आहे. त्यापैकीच सामाजिक बांधिलकी जपणारे वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणून होमिओपॅथीक तज्ञ डॉ. राजेंद्र श्रीमाळी यांचे नाव घेता येईल.१५ जानेवारी भारतीय लष्कर  दिनी  ‘डॉ. श्रीमाळी यांनी सर्व आर्मी जवानांचा गौरव व सत्कार केला. देशासाठी लढणारे व देशाचे रक्षण करणारे सर्व सैनिक आम्हास नेहमीच गौरवास्पद व अभिमानास्पद असून आज त्यांचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली असल्याच्या भावना डॉ. राजेंद्र श्रीमाळी यांनी यावेळी व्यक्त केल्या .
यावेळी डॉ. यश श्रीमाळी(नाशिक) म्हणाले,डॉ. श्रीमाळीज क्लिनीकद्वारे नेहमीच विविध सामाजीक उपक्रम राबविले जातात. कोविड काळातही अनेक रुग्णांना मोफत होमिओपॅथीक उपचार करण्यात आले आहेत. या निमित्ताने यापुढे देशाची सेवा करणाऱ्या  सैनिकांची सेवा करण्यातही विशेष आनंद मिळेल.
यावेळी निवृत्ती सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष डि.के.कोपरे यांनी आपल्या मनोगतात संघटनेस येणाऱ्या अडचणी व उपक्रमांची माहिती दिली.
या प्रसंगी डॉ राजेंद्र श्रीमाळी ,अरविंद भन्साळी ,बबलू वाणी ,रिंकेश खुबानी , डॉ यश श्रीमाळी व सैनिक संघटनेचे . सुभाष क्षीरसागर,विकास दुशिंग, रवी आचारी, कानकुब्जी, देवतरसे, जगताप, वाघ, निंबाळकर आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते .
डॉ. यश श्रीमाळी यांनी आभार  व्यक्त  केले.

चौकट

 अशोक धुमाळ हे आपल्या प्रत्येक वडापावच्या विक्रीतुन एक रुपया संकल्प निधी म्हणून शहीद जवानांच्या कुटुंबीयासाठी जमा करीत आहेत.  त्यांचा सत्कार डॉ. राजेंद्र श्रीमाळी यांनी केला. 

Leave a Reply

You cannot copy content of this page