खुले नाट्यगृहाचा ठेकेदार बदलणार; प्रशासक अधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल

खुले नाट्यगृहाचा ठेकेदार बदलणार; प्रशासक अधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल

Open theater contractor to change; Administrative officers took serious notice

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue17Jan23 , 17.40 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : शहरातील अण्णाभाऊ साठे खुलेनाट्यगृहाचे दुरुस्तीची निविदा निघून ठेका दिल्यानंतर सव्वा ते दीड वर्ष उलटून गेले तरीही  दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही. याप्रकरणी प्रसारमाध्यमातून टीकेची झोड उठल्यानंतर  याची गंभीर दखल नगरपरिषद प्रशासनाने घेतली आहे. संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावणार असून त्याच्यामध्ये सुधारणा न झाल्यास आम्ही ठेकेदार बदलणार असल्याचे नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी शांताराम गोसावी यांनी सांगितले.

दुरा अवस्था झालेले खुलेनाट्यगृह
शहरातील एकमेव असलेल्या अण्णाभाऊ साठे खुलेनाट्यगृहाची दुरावस्था झाल्याने मोठ्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून सदर खुले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांचा निधी आला आहे त्याप्रमाणे नगरपालिकेने निविदा प्रसिद्ध करून सव्वा ते  दीड वर्षांपूर्वी येथील एका स्थानिक ठेकेदारास काम दिले होते. त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या हस्ते कामाच्या शुभारंभाचे नारळ ही फोडण्यात आले होते. परंतु  आजतागायत खुले नाट्यगृहाच्या दुरुस्तीच्या कामाची  सुरुवात झाली नाही. याची चर्चा अनेकदा चहाट्यावर आली.  याबाबत सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी कडून वारंवार विचारणा होत असल्याने नगरपालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.
 मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी  यांनी सांगितले  की, ठेकेदार यांचेशी आपली चर्चा झाली असून त्यांनी आपल्याला सदरचे काम परवडत नसल्याचे सांगितले असुन संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात येणार आहे.  त्याच्यांत सुधारणा न झाल्यास ठेकेदार बदलणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

 

 

 

फोटो मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांना खुले नाट्यगृहाचे काम त्वरित सुरू व्हावे अन्यथा २६  जानेवारीला आंदोलन करू हे निवेदन देताना लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नितीन पोळ मनसेचे संतोष गंगवाल, शिवसेनेचे प्रवीण शिंदे, निसार शेख तुषार विध्वंस, योगेश गंगवाल दिसत आहेत

चौकट

एक वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०२२ रोजी अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या ठेकेदाराकडून काम काढून घ्या, अशी मागणी  नगर पालिकेकडे केली होती, परंतु वर्ष होऊनही काम सुरू झाले नाही किंवा ठेकेदारावर ही कारवाई झाली नाही  येत्या २६ जानेवारी पर्यंत काम सुरु न झाल्यास पालिका अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार  असल्याचा इशारा लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नितीन पोळ यांनी नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनातून मंगळवारी (१७) रोजी दिला आहे.

कोट

 अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी एक कोटीचा ठेका देण्यात आला होता. परंतु सव्वा ते  दीड वर्षे उलटूनही काम सुरू झाले नाही.काम न झाल्यामुळे नागरिक व नाट्य रसिकांचे सांस्कृतिक व पालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे   उशीर झाल्यामुळे सदर कामाचे  इस्टिमेट वाढणार आहे फेरनिविदा फेर टेंडर  यात  वेळ आणि पैसे वाया जाणार आहेत. याला जबाबदार कोण ? असा सवाल करताना आता खुलेनाट्यगृहाची दुरुस्ती करण्यापेक्षा आणखी निधी आणून अत्याधुनिक सर्व सोयींनी युक्त असे नवीन खुले नाट्यगृह बांधावे  अशी मागणी अमृत संजीवनी चे अध्यक्ष  पराग संधान यांनी केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page